पंढरपूर प्रतिनिधी, समस्त नाभिक समाज पंढरपूर हिंदवी स्वराज्य भूषण शिवबा काशीद मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने आज संत सेना महाराज मठ येथे पाणपोई चे उद्घाटन करण्यात आले.हे उद्घाटन नाभिक समाजातील ज्येष्ठ नागरिक भाई राजेंद्र भोसले, नारायण खंडागळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी बारा बलुतेदार व अलुतेदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई किशोर भोसले, समिती अध्यक्ष साईनाथ शिंदे, धनंजय गवळी, अनिल शेटे, विठ्ठल भोसले, राकेश देवकर, गणेश माने, आदी उपस्थित होते.या वेळी नाभिक समाजातील ज्येष्ठ नागरिक औदुंबर माने, बबन शेटे, माऊली चौधरी, केशव शेटे, सुर्यकांत शिंदे, राजाभाऊ शिंदे, दिपक सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते. ह्या पाणपोई उद्घाटन करण्यात आल्या बद्दल समस्त नाभिक समाजाच्या समाजातुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.हा कार्यक्रम समाजाचे नेते जितेंद्र भोसले, सतिश चाह्वान तुकाराम चव्हाण यांनी पार पाडला. दरम्यान मान्यवरांचे स्वागत तेजस भोसले यांनी केले.


0 Comments