LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूरातील मा. दिपक राजाराम नाईकनवरे यांना आणखी एक सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठेचा हा पुरस्कार

 


पंढरपूर (प्रतिनिधी) अ.नगर येथे युवाक्रांती महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतिने विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या कर्तृत्वान मान्यवरांचा सन्मान सोहळा शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार संपन्न विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान. पंढरपूरातील मा. दिपक राजाराम नाईकनवरे यांना आणखी एक सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठेचा हा पुरस्कार मिळाला आहे. या कार्यक्रमामध्ये आमदार संग्रामभैय्या जगताप, मा.श्री. दादा महाराज वसेकर (सावतामाळी यांचे १७ वे वंशज), डॉ. सागर बोरडे (नगरसेवक), मा. धनंजयभैय्या जाधव (नगरसेवक) व या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण, मा. राज चामरे, प्रसिद्ध मॉडेल, ॲक्टर मिस्टर इंडिया 2020, व मा. सुमैय्या पठाण,(प्रसिद्ध सेलेब्रिटी, व फॅशन डिझायनर मराठी हिंदी बिग बॉस शो) व मुख्य संपादक तुषार बोरुडे उपस्थित होते. यावेळी बोलताना दिपक नाईकनवरे म्हणाले की, असे पुरस्कार मला प्रेरणा देतात, पुढे आणखी जोमने कार्य करण्याची ऊर्जा देतात अशा पुरस्काराने समाजातील माझी जबाबदारी अजून जास्त वाढली आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर व सर्व महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन समाजातील युवा पिढींना चांगली दिशा देण्याचे कार्य करीत आहे. हा पुरस्कार म्हणजे मी आतापर्यंत केलेल्या निःस्वार्थी आणि प्रामाणिक कार्याची पावतीच आहे. मला खूप आधीपासूनच सामाजिक कार्याची आवड असल्याने लोकांच्या अडचणी सोडविणे तसेच लोकांना लहान-मोठ्या प्रशासकीय कामांमध्ये मदत करणे, तसेच माझ्या परीने होईल तितकी मदत करणे या सगळ्याची दखल घेऊन मला हा पुरस्कार मिळाला आहे. मी व माझे बंधू विक्रम माझ्या वडीलांचे पाऊलावर पाऊल ठेऊन कार्य करीत आहे. व त्यांनी जी स्वप्ने पाहीली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आता पर्यंत कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रामध्ये मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये हा एक मानाचा पुरस्कार मिळाल्याने मला आणखी जोमाने कार्य करण्याची जबाबदारी वाढली आहे. जी मी नक्की पार पाडेन व पुढे देखिल अशीच उल्लेखनीय कार्य करुन माझ्या वडीलांचे स्व. राजाराम नाईकनवरे यांचे व पंढरपूरचे महाराष्ट्राचे नांव लौकिक करण्याचा प्रयत्न करेन. हा पुरस्कार मिळाल्यामुळे सर्वच  स्तरातून कौतुक होत आहे. 

Post a Comment

0 Comments