पंढरपूर प्रतिनिधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान च्या वतीने राज्य स्तरीय वीर रत्न शिवा काशीद पुरस्कार भाई किशोर भोसले यांना गौरविण्यात आले. हा पुरस्कार सोलापूर जिल्हा चे माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या शुभहस्ते देण्यात आला
या वेळी अमर साबळे, नगरसेवक डी राज सर्वगोड, नितीन काळे,शुक्ला मॅडम, भैय्या देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते
भाई किशोर भोसले हे बारा बलुतेदार व अलुतेदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत
त्यांनी संघटनेच्या माध्यमातून पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात सामाजिक कार्य चांगल्या प्रकारे काम करत आहेत. तसेच हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्था च्या वतीने भाई किशोर भोसले संस्थांचे अध्यक्ष अॅड रामलिंग कोष्टी, नगर परिषद चे सुनिल वालुजकर यांनी ही सत्कार केला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल भाई किशोर भोसले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे


0 Comments