पोलिसांची कौतुकास्पद कामगीरी
(संभाजी पुरीगोसावी रायगड जिल्हा पेण प्रतिनिधी. )
वडखळ पोलीस ठाण्यात आरोपी म्हणुन नोंद असलेल्या नंदू पाटील याने सेवानिवृत्त शिक्षकांच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावतो म्हणून १४ लाख ६७ हजार रुपये (लाखो रुपये) घेवून गुन्हा दाखल झाल्या पासून गेली ४ महिने पळून जावुन पोलीसांना आपले अस्तित्व सतत बदलून बदलून गुंगारा देत होता. मात्र वडखळ पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक जलद गतीने फिरवत आरोपी याला पकडण्यासाठी तपास सुरु ठेवला होता आरोपी याची तांत्रिक माहिती काढून,सदर परिसरांत पोलीस उप निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस हवालदार अमित पाटील यांनी पाळत ठेवून त्याला पकडून फसवणूक आदी गुन्ह्यात अटक केली आहे.
आरोपी याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस १९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे असून पुढील तपास वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
या आरोपीला झालेल्या अटके मुळे फिर्यादी शिक्षक सहकुटुंब यांनी वडखळ पोलीस ठाण्यात येवुन पोलीसांचे आभार मानले तर पोलिसांचे तालुक्यातून कौतुक होत आहे.


0 Comments