पुण्यात शिकणाऱ्या लातूरच्या तरुणीचा खंडणीसाठी खून: अपहरण करून तीन मित्रांनीच केला घात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,
संभाजी पुरीगोसावी (पुणे शहर ) प्रतिनिधी. लातूरहुन शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका २२ वर्षाच्या तरुणीचे तिच्याच मित्रांनी खंडणीसाठी अपहरण केले मात्र त्यानंतर पैसे मिळाले तरी तरुणी घरी आपले नाव सांगेल, या भीतीने तिचा खून केला पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी सुपा परिसरांतील एका शेतात मृतदेह पुरला खून केल्यानंतर आरोपींनी तरुणीच्या मोबाईलवरून तिच्या कुटुंबाकडे ९ लाखांची खंडणी देखील मागितली होती. या प्रकरणात ३ आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली आहे. भाग्यश्री सूर्यकांत सुडे (वय २२) रा. विमानतळ मूळ रा. हरंगुळ बुद्रुक ता. जि. लातूर ) असे या तरुणींचे नाव आहे. या प्रकरणी शिवम फुलावळे सागर जाधव आणि सुरेश इंदरे या तिघांना अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार... मयत तरुणीचे वडील सूर्यकांत ज्ञानोबा सुडे यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात ३० मार्च रोजी अपहरणाची तक्रार दाखल केली होती. तिन्ही आरोपी हे तरुणीचे जवळकीचे मित्र होते. कर्जबाजारीपणा आणि लालसेतून आरोपींनी हे कृत्य केले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुळची लातूरची असलेली भाग्यश्री ही वाघोली परिसरांत एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षण घेत होती. ३० मार्च रोजीच्या रात्री नऊच्या सुमारांस ती विमानतळ परिसरांतील फिनिक्स मॉल येथून बेपत्ता झाली होती. त्यानंतर लातूरवरुन आई-वडिलांनी पुण्यात धाव घेवुन विमानतळ पोलिस ठाण्यात मुलीच्या अपहरणाबाबत तक्रार दाखल केली होती.


0 Comments