LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्राचा पदभार स्वीकारला

डॉ. शशिकांत महावरकरांची पिंपरी चिंचवडच्या सह आयुक्त पदावर बदली

संभाजी पुरीगोसावी (नांदेड जिल्हा) प्रतिनिधी. नांदेड परिक्षेत्राचे नूतन पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) डॉ.शशिकांत महावरकर यांच्याकडूंन पदभार स्वीकारला आहे, शहाजी उमाप हे मुंबईचे विशेष शाखेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते, नाशिक ग्रामीण नांदेड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून उत्कृंष्ट कामगिरी बजावली होती, कर्तव्यदक्ष,शिस्तप्रिय सामाजिक दृष्टिकोन ठेवून वेळप्रसंगी कठोर भूमिका घेणारे अधिकारी म्हणून त्यांची पोलीस खात्यात चांगलीच ओळख आहे, शहाजी उमाप यांच्या बदलीचे पत्र हे सोशल मीडियावर मागील काही दिवसांपूर्वी व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरांतून त्यांचे स्वागत करण्यात आले होते, सध्या नांदेड पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, मावळते नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (डीआयजी) डॉ.शशिकांत महावरकर यांची मागील काही दिवसांपूर्वी चुकीच्या पद्धतीने झालेल्या बदलीबाबत शासन देखील नरमले होते, अखेर शासनाकडूंन त्यांना बदलीच्या निवडीचे पसंती सांगण्याबद्दल चार वेगवेगळे पर्याय दिले होते, त्यानुसार त्यांनी पिंपरी चिंचवडच्या सह आयुक्त या पदाला चांगलीच पसंती दिली होती, अखेर त्याच पदावर (डीआयजी) डॉ.शशिकांत महावरकर यांची बदली करण्यात आली, त्यांच्या रिक्त जागेवर शहाजी उमाप यांची नियुक्ती देखील करण्यात आली होती, दिनांक 12 जुलै रोजी नांदेड येथे येवुन शहाजी उमाप यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र  कॅटचे आदेश या कार्यालयाने दाखविल्यानंतर ते पुन्हा माघारी परतले होते, एकंदरीत चुकीच्या पद्धतीने केलेल्या बदलीबाबत राज्यांच्या गृह विभागांने नांगी टाकून नरमाईची भूमिका चांगलीच घेतली होती, त्यानंतर मागील दोन दिवसांपूर्वी पुन्हा आपल्या सूचनेनुसार ही बदली झाल्याचे समाधान (डीआयजी) डॉ.शशिकांत महावरकरांना मिळाले, यावेळी मावळते विशेष पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) डॉ.शशिकांत महावरकरांनी आपल्या पदाचा पदभार नूतन विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे स्वागत करीत सोपविला आहे.

Post a Comment

0 Comments