संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. साताऱ्यात आजारपणाला कंटाळून वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेवुन आपले जीवन संपवले आहे, तिच्या या कृत्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे, आदिती सदानंद इंगळे (वय 17) साई पुष्प अपार्टमेंट समता पार्क शाहूपुरी सातारा) असे मृत तरुणीचे नाव आहे, आदिती इंगळे हिला फिटचा त्रांस होता यातूनच ती नेहमीच नैराश्यात होती, अखेर तिने बुधवारी दुपारी दोनच्या सुमारांस बेडरूममध्ये गळफास घेतला, हा प्रकार घरातल्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने 108 रुग्णवाहिकेला कॉल केला, यानंतर काही वेळातच रुग्णवाहिकेतील डॉक्टर तेथे पोहोचले यावेळी डॉक्टरांनी आदिती इंगळे हिची प्रथम तपासणी केली असता ती मृत झाल्याचे त्यांनी घोषित केले, आदिती इंगळे हिच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबासह पै. पाहुण्यांना देखील धक्का बसला आहे, अथर्व सदानंद इंगळे (वय 20) या तरुणाने शाहूपुरी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असून, पोलीस हवालदार दादा रांजगे हे तपास करीत आहेत
0 Comments