LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

विडणीकरांनी घडवले माणुसकीचे दर्शन...? महिला पोलीस पाटलांच्या सतर्कतेमुळे चुकलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबाची झाली भेट

संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दिनांक 11 जुलै सातारा जिल्ह्यात प्रस्थान झाल्यानंतर (फलटण ता.) विडणी गावांमधून माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत लाखों वारकऱ्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले होते, यावेळी पालख्यांबरोबर अनेक दिंड्या गेल्या होत्या यामधील हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यांतील एक वारकरी नारायण लक्ष्मण पोपळघट हे चुकले होते, त्यांना फिट येत असल्याने अगोदरच आजारी असल्यांने आपल्या दिंडीमध्ये न जाता ते विडणी मध्येच राहिले होते, मात्र वारकरी नारायण लक्ष्मण पोपळघट यांना श्री. अमोल रघुनाथ नाळे यांनी माणुसकी दाखवत नाळे कुटुंबीयांनी त्यांची राहण्याची,जेवणाची सोय केली त्यांना बोलता येत नव्हते अंगात ताप चढला होता, फिट आल्याने दुसऱ्या दिवशी विडणीच्या पोलीस पाटील सौ.शितल धनाजी नेरकर मॅडम यांना फोनवरून कळविले होते, यावेळी पोलीस पाटलांनी 108 रुग्णवाहिकेला संपर्क साधून फलटण जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते, तोपर्यंत दिंडी चालकांने नारायण पोपळघट बेपत्ता असल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली होती, त्यांचे जागोजागी पोस्टर लावण्यात आले होते, यावेळी विडणीच्या पोलीस पाटील सौ. शितल नेरकर मॅडम यांनी वारकऱ्याची माहिती फोटोसह महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस राज्य संघटनेच्या ग्रुपवर पाठवली होती, सदरचा संदेश अखेर  कुटुंबापर्यंत पोहोचला त्यांनी विडणीच्या पोलीस पाटलांशी संपर्क साधला असता यावेळी नारायण पोपळघट हे रुग्णालयात उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले, अखेर पोलीस पाटील यांच्या सतर्कतेमुळे वारकऱ्याची कुटुंबाशी भेट घडवून आणली, त्यांच्यासह विडणी मधील श्री. अमोल रघुनाथ नाळे पोलीस पाटील सौ. शितल नेरकर मॅडम यांचेही सर्व स्तरांतून विशेष कौतुक होत आहे, तर हिंगोली जिल्ह्यातून देखील त्यांच्या या कार्याला सलाम मिळाला आहे,

Post a Comment

0 Comments