जिल्ह्यात नव्याने येणारे एसपी या कारभाऱ्याची उचलबांगडी करणार?
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी सातारा जिल्हा पोलीस दलातील दहिवडी पोलीस ठाण्यातील स.पो.नि.अक्षय सोनवणे हे प्रभारी तत्कालीन एसपी अजयकुमार बन्संल यांच्या आदेशावरून ते आजपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या कालावधीपासून पोलीस ठाण्यात तळ ठोकून आहे, सदर स.पो.नि. अक्षय सोनवणे या प्रभारी अधिकाऱ्याला राजकीय झालंर देखील दिसून येत आहे, वारंवार पोलीस अधीक्षकांना या स.पो.नि. यांच्या बदली बाबत विनंती आणि निवेदन देवुनही पोलीस अधीक्षकांचे देखील दुर्लक्ष आणि राजकीय दबाव असल्यासारखे स्वतः जिल्ह्याचे एसपी या पोलिस ठाण्याच्या कारभारांकडे दुर्लक्ष करीत आहे, माण तालुका हा राजकीय नेत्यांचा तालुका म्हणून तालुक्यांची चागलीच ओळख आहे, या पोलिस ठाण्याचे कारभारी देखील राजकीय मर्जीतील असल्याचेही बोलले जात आहे, यापूर्वी ते फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दुय्यम अधिकारी म्हणून काम पाहत होते, तत्कालीन एसपींना आणि राजकीय नेत्यांना भेटून त्यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून संधी साधून घेतली आहे, माण तालुक्यांच्या कार्यक्षेत्रातील नेत्यांचे सभा काही कार्यक्रम असल्यास प्रभारी अधिकारी आपल्या सहकार्यसमवेत प्रथम उपस्थित असतात, तसेच पोलीस ठाण्याचे प्रभारी हे तालुक्यांच्या पत्रकारांनाच प्रथम प्राधान्य देतात, स.पो.नि.अक्षय सोनवणे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात त्यांनी चांगलाच तळ ठोकला आहे, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रभारी अधिकाऱ्याची बदली होईल अशी शक्यता होती, मात्र या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याच्या बदलीबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना राजकीय दबाव आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे, पुढील दोन-तीन महिन्यांत जिल्ह्यात नव्याने एसपी त्यांची नक्कीच बदली करतील अशी अशा आहे, मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहिवडी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याची बदली होणे अत्यंत गरजेचे आहे, मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या बदलीबाबत निर्णय घ्यावा,
0 Comments