LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पुणे शहरांत चारित्र्यांच्या संशयावरून नवऱ्याकडूंन महिला पोलिस पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न

 संभाजी पुरीगोसावी ( पुणे शहर ) प्रतिनिधी. पुणे शहरांत चारित्र्यांच्या संशयावरून नवऱ्याकडूंन महिला पोलीस असलेल्या पत्नीचा गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे, हर्षद विकास पानसरे (वय 36 रा. पोलीस लाईन विश्रांतवाडी ) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे, याबाबत फिर्यादी महिला पोलीस शनिवारी पहाटे विश्रांतवाडी येथील माझ्या घरातच चारित्र्यांच्या संशयावरून गळा आवळण्याचा प्रयत्न पतीने केला, फिर्यादी महिला पोलीस आणि हर्षद पानसरे यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता, हर्षद हा एका कंपनीत काम करतो दोघेही विश्रांतवाडी पोलीस लाईन मध्ये वास्तव्यास आहेत, हर्षद नेहमीच चारित्र्यांचा संशयावरून संशय घेवुन घाणेरेड शिवीगाळ करत बदनामीकारक मेसेज पाठवून वाद घालत असे, शनिवारी पहाटे गादीवर ढकलून मी तुझा जीवच घेतो असे, म्हणून गळा आवळला त्या ओरडायला लागल्यावर एका हाताने गळा व एका हाताने तोंड दाबुन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी प्रतिकार करीत आपली सुटका करून घेतली व पोलिसांशी संपर्क साधला, त्याचबरोबर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी हर्षद पानसरे याला ताब्यांत घेतले वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके तपास करीत आहेत,

Post a Comment

0 Comments