संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा विभागीय कोरेगांव एसटी आगारांच्या नूतन आगार व्यवस्थापक सौ. नीता जगताप मॅडम यांनी तत्कालीन आगार व्यवस्थापक शंकर यादव यांच्या रिक्त झालेल्या जागेवर नुकताच पदभार स्वीकारला असून. सौ. नीता जगताप मूळच्या सातारा जिल्ह्यातील असून त्यांनी यापूर्वी (रायगड जिल्हा ) सातारा खंडाळा या आगारात आगार व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे. सौ.नीता जगताप यांना आपल्या तालुक्यांतच प्रवाशांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. तालुक्यांच्या एसटी आगारांत प्रथमच महिलाराज लाभल्या आहेत. आज रोजी दुपारी त्यांच्या कक्षात जयहिंद मॅडम असे म्हणत... संभाजी पुरीगोसावी यांनी त्यांची सदिंच्छा भेट घेवुन स्वागत करीत शुभेच्छा दिल्या, तत्कालीन आगार व्यवस्थापक शंकर यादव यांनीही कोरेगांव आगारांमध्ये उत्कृंष्ट काम पाहिले होते. त्यांच्या बदलीपासून कोरेगांव आगारांचे व्यवस्थापक हे पद चांगलेच रिक्त होते. अखेर राज्य परिवहन सातारा विभागीय वरिष्ठांच्या आदेशावरुन कोरेगांव आगार व्यवस्थापक म्हणून सौ. नीता जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरेगांव एसटी आगारांच्या इतिहासांत प्रथमच त्या महिला राज ठरल्या आहेत.
0 Comments