उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची गावातील हरिदास भजनावळे यांचा दुग्धव्यवसाय असून काही दिवसापूर्वी गुळवंची गावातील ओढ्याच्या पाण्यात विजेचा करंट उतरल्याने १९ म्हशी दगावल्या. यामुळे त्यांचे खूप मोठ्ठे आर्थिक नुकसान झाले. पशुपालक हरिदास भजनावळे यांच्या घरी प्रणितीताई शिंदे यांनी सांत्वनपर भेट दिली होती. दुग्ध व्यवसायावरचं संपूर्ण भजनावळे कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होता त्यांना दुसरे उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांना आर्थिक मदत केली
0 Comments