LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीने 24 ऑगस्ट महाराष्ट्र बंद

महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीने 24 ऑगस्ट महाराष्ट्र बंद

बदलापूर येथील लहान मुलींवर तसेच राज्यात मोठ्या प्रमाणावर महिला अत्याचार सुरू आहेत महायुती सरकारचे लक्ष नाही या असंवेदनशील सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने शनिवार 24 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र बंद मध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन महाविकास आघाडीचे नेते नरसय्या आडम, चेतनभाऊ नरोटे, अजय दासरी, U. N. बेरिया यांनी सोलापूर शहर पत्रकार संघात पत्रकार परिषदेत केली
यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, शहर प्रमुख दत्तात्रय वानकर, देवाभाऊ गायकवाड, रेवण पुराणिक, भीमाशंकर टेकाळे, संजय गायकवाड, विवेक कन्ना, राजेंद्र शिरकुल, सुनील सारंगी, शंकर अंजनाळकर, आदी उपस्थित होते

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिरात शिकणाऱ्या चार वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतील नराधम कर्मचाऱ्यांने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे या मानवी कृत्याविरोधात राज्यभरात मोठ्या प्रमाणात संतापाचे लाट उसळली आहे. ज्या शाळेत हे अत्याचार झाले आहे ती शाळा भाजपाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधित लोकांची आहे सत्ताधारी लोकांशी संबंधित लोक यामध्ये सहभागी असल्याने पोलीस प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला पीडित मुलींच्या आईचां तक्रार दाखल करून घेण्याऐवजी पोलिसांनी त्या गरोदर मातेला अकरा तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले पोलीस आणि सरकारच्या गलथान कारभाराचा व असंवेदनशीलतेचा ज्वलंत उदाहरण आहे राज्याच्या मुख्यमंत्री महोदयाच्या जिल्ह्यातच माता-भगिनी महिला सुरक्षित नाहीतर राज्यातील इतर भागात कायदा व सुव्यवस्था कशी असेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. दिनांक २०ऑगस्ट २०२४ रोजी या घटनेच्या विरोधात संतप्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बदलापूर येथे आंदोलन करून रेल रोको केला होता. पण सरकारकडून मात्र हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला स्थानिक नागरिकांनी हे प्रकरण लावून धरल्याने सरकारला नाईलाजाने कारवाईला सुरुवात करावी लागले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात महिला मुलीवर अत्याचार सुरू आहेत सरकार आणि पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही महिला मुलींना सुरक्षित वातावरण देण्यास सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे बदलापूरच्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे.

तरी सोलापूर शहरातील सर्व नागरिक बंधू भगिनींनी व व्यापारी, दुकानदारांनी या महाराष्ट्र बंद आणि सोलापूर बंद मध्ये सहभाग घेऊन सहकार्य करावे तसेच महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बंद यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन कम्युनिष्ट पार्टीचे माजी आमदार नरसय्या आडम, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अजय दासरी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष सुधीर खरटमल, यांनी केले आहे.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments