
*तासवडेच्या सरपंचपदी सौ: दीपाली जाधव बिनविरोध विजयी... गावची सूत्रे हाती घेताच, नेहमीच प्रयत्नशील राहणार विकास कामांची दिली ग्वाही, संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यांतील तासवडे गावच्या सरपंच पदी सौ. दिपाली अमित जाधव यांची बिनविरोध विजयी निवड झाली आहे, जिल्हा युवा काँग्रेसचे कार्याध्यक्ष व शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमित जाधव यांच्या त्या पत्नी आहेत, तासवडे ग्रामपंचायतीची वार्षिक निवडणूक 2001 मध्ये झाली होती, निवडणुकीत सह्याद्री ग्रामविकास आघाडीचे सत्ता स्थापन झाली या निवडणुकीत नऊ पैकी सात जागा आघाडीच्या निवडून आल्या होत्या, सरपंच पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्याने या पदावर दरवर्षी एका महिला सदस्यांना सरपंच पदाची संधी मिळते आणि याच ठरावांतून अखेर सौ. दिपाली जाधव यांच्या गळ्यात सरपंच पदाचा हार पडला आहे, या आघाडीचे नेतृत्व अमित जाधव राजेंद्र जाधव व विकास जाधव यांनी केले आहे मंडलाधिकारी जयराम बोकडे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले यावेळी ग्रामसेवक समाधान माने उप.सरपंच भीमराव खरात सदस्य सुभाष जाधव निवास जाधव दत्ता जाधव भारती शिंदे मनीष जाधव यावेळी आदीं सदस्यांची यावेळी उपस्थिती होती, यावेळी नूतन सरपंच सौ. दिपाली जाधव पुढे म्हणाल्या... तासवडे गावातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार असून 80 टक्के रस्ते पूर्णता झाले आहेत, भविष्यात इतर रस्ते जिल्हा नियोजन आणि स्थानिक विकास निधीतून करण्यासाठी प्रयत्नशील, तसेच शासनांच्या योजना देखील तळागाळापर्यंत पोहोचविणार आहोत तसेच मी नेहमीच प्रयत्नशील राहील अशी ठाम ग्वाही सौ. दिपाली जाधव यांनी दिली आहे, त्यांच्या या निवडीबद्दल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार बाळासाहेब पाटील माजी खासदार श्रीनिवास पाटील उदयसिंह पाटील प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे कराड दक्षिण उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवास थोरात यांच्यासह तासवडे गावच्या परिसरांतील जनतेमधून अभिनंदनचा वर्षाव होत आहे,*
0 Comments