तसेच महाराष्ट्रातील नवनिर्वाचीत खासदारांचा सत्कार समारंभाचे रविवार दि.29 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल, अकलूज येथे आयोजन केलेले आहे. तरी कार्यक्रमास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी, नागरिक बंधु भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन धैर्यशील मोहिते पाटील, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीत केले आहे.
यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हा कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापूरे, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, विनोद भोसले, गणेश डोंगरे, प्रमिला तुपलवंडे, अंबादास बाबा करगुळे, भीमाशंकर टेकाळे, जुबेर कुरेशी, मयूर खरात, तिरुपती परकीपंडला, राज सलगर, संजय गायकवाड, यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर व जिल्ह्यातील नेते मंडळी, पदाधिकारी, उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments