पंढरपूर, दिनांक :- २४ सप्टेंबर २०२४
एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य वतीने आज पंढरपूरात राज्यव्यापी मेळावा आयोजित असून या मेळाव्यात सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांनी सहभाग घेऊन आपले विचार व्यक्त केले.
यावेळी चेतन भाऊ नरोटे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाची एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी आहे. त्यासाठी आज पर्यंत अनेक आंदोलने झाली पंढरपुरात गेल्या अनेक दिवसापासून समाज बांधव घरदार कुटुंबीयांना सोडून समाजासाठी राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू केले आहे. समाज एक होऊन आंदोलन केल्यामुळे सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले. यांचप्रकारे अहिल्यादेवींचे आशीर्वाद घेऊन एकजूट होऊन आणि प्रत्येक जण नेता होऊन आरपारची लढाई लढू या. अभी नही तो कभी नही. राज्यात देशात एकाच विचाराचे सरकार आहे. त्यामुळे लवकरात लवकर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावे अन्यथा धनगर समाज धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा पंढरपूर येथे धनगर समाजाचे नेते, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी सरकारला दिला आहे.


0 Comments