LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

संगमनेर शहर पोलीस ठाण्याला मिळाला पुन्हा खमक्या अधिकारी...? पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी स्वीकारला पदभार तर पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन डी वाय एसपी पदावर बढती

संगमनेर शहर पोलीस ठाण्याला मिळाला पुन्हा खमक्या अधिकारी...? पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी स्वीकारला पदभार तर पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन डी वाय एसपी पदावर बढती, संभाजी पुरीगोसावी (अह.नगर जिल्हा ) प्रतिनिधी. संगमनेर शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढले असून, नवीन पोलीस अधिकाऱ्यांसमोर गुन्हेगारी रोखण्याचे व गुन्ह्यांचा तपास लावण्यात अपयशी ठरलेल्या गुन्हे प्रकटीकरण शाखेवर विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे, संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची वर्णी पोलीस ठाण्याला लागली आहे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर बापूसाहेब महाजन यांनी पदभार स्वीकारला होता, मात्र महाजन यांची उपविभागीय पोलिस अधिकारी या पदावर बढती झाली असुन, महाजन यांची देखील कारकीर्द ही संगमनेर पोलीस ठाण्यात काहीच दिवसांची ठरली, आता गणेशचतुर्थी पासून नव्याने आणि धुळे जिल्ह्यात शिरपूर साक्री अशा विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा बजावलेले पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशावरून संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासमोर आता गणेशोत्सव व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरांतील वाढत्या चोऱ्या व इतर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे

Post a Comment

0 Comments