खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामधील मौजे सोहाळे येथे 11 मायनर ते अंकुश जगताप शेतापर्यंत कॅनालपट्टीचे मुरमीकरण आजतागायत करण्यात आले नव्हते. यामुळे विद्यार्थी, शेतकरी, ग्रामस्थांना ये-जा करण्याकरीता अडचणी निर्माण होत होती. यामुळे ग्रामस्थांनी सदरचे काम खासदार प्रणिती शिंदे यांना भेटून निवेदनाव्दारे मागणी केली होती. त्यानुसार खासदार प्रणिती शिंदे यांनी मा. अधिक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर यांना याबाबत सुचना दिल्या होत्या
खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मौजे सोहाळे येथे 11 मायनर ते अंकुश जगताप शेतापर्यंत कॅनालपट्टीचे मुरमीकरण करणे या कामास सुरुवात झालेली आहे. तसेच कॅनालमधील गाळ काढण्याचे काम लवकरच होईल असे आश्वासन खासदार प्रणिती शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिले. याबद्दल गावातील ग्रामस्थांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानले आहे
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments