शेतकरी आणि सर्वसामान्य जनता विरोधी महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या संग्राम मोर्चाच्या नियोजनासाठी सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक काँग्रेस भवन सोलापूर येथे आयोजित केली होती. या मोर्चामध्ये काँग्रेस, आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, नागरिक बंधु भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन खासदार प्रणिती ताई शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी केले आहे.
या बैठकीस जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, शहरअध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी आमदार दिलीपराव माने, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी यांच्या सह शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments