LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मंगळवेढा चौक ते सैनिक विश्राम गृह या मार्गावरील जड वाहनांची वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी नागरीकांची मागणी



पंढरपूर -: मंगळवेढा चौक ते सैनिक विश्राम गृह हा मार्ग दाट लोकवस्ती असलेल्या भागातून जात असल्याने या मार्गावरील जड वाहनांची वाहतूक ही धोकादायक होत चालली आहे ऊस वाहतूकीने कहर केला आहे. सायंकाळच्या वेळी तर नागरीकांना जीव मुठीत धरून बाहेर पडावे लागते आहे वाहनांमध्ये ओव्हर टेक करण्यासाठी चालू असलेली स्पर्धा तर अंगावर काटा आणणारी ठरत आहे. या मार्गावर पुर्वी अपघात झालेले आहेत या मार्गावरील वाहतूकीचे भीषण वास्तव लक्षात घेऊन वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतः पाहणी करून शक्य तितक्या लवकर या मार्गावरील जड वाहनांची वाहतूक बंद करावी अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments