पंढरपूर(प्रतिनिधी):- तीर्थक्षेत्र पंढरपुरात अनेक दिवसापासून दिवस रात्र वाळू चोरी होत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर वाळू तस्करीत असलेले चार सराईत गुन्हेगार यांना ५० दिवसांसाठी पंढरपूर शहरातून हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी दिली.
पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील अवैधपणे वाळु व्यवसाय करणारा वाळु तस्कर टोळीतील सराईत गुन्हेगार ग्यानबा दिपक धोत्रे, रा. जुनी वडार गल्ली, हा (टोळी प्रमुख), गणेश यलाप्पा बंदपटटे रा. सरगम चौक, जुनी वडार गल्ली, हा (टोळी सदस्य),किरण माणिक धोत्रे रा. सरगम चौक, जुनी वडार गल्ली, (टोळी सदस्य), बाळासाहेब अंकुश पवार रा. सरगम चौक, जुनी वडार गल्ली, (टोळी सदस्य) या चार सराईत गुन्हेगारांच्या विरूध्द वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी २ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्यामुळे हद्दपार प्रस्ताव तयार करून हद्दपारी चे कारवाईबाबत अहवाल सादर केला होता.
दरम्यान डॉ. अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सदर हददपार करणेच्या संदर्भातील काम चालवुन सदरबाबतचा सविस्तर अहवाल पोलीस अधिक्षक,अतुल कुलकर्णी सोलापुर ग्रामीण यांचेकडे सादर केला होता त्या अनुशंगाने हद्दपार कामकाज चालवुन सदर टोळी प्रमुख व सदस्यांना पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी संपुर्ण सोलापूर जिल्हयातून ५० दिवस कालावधी करीता हद्दपार करण्यात आले. सदर चारही सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेवून सदर हददपार आदेश बजावण्यात आलेला आहे. यापुढेही पंढरपूर शहर पोलीस ठाणेचे गुन्हे अभिलेखावरील दोन पेक्षा जास्त दाखल गुन्हयातील वाळू तस्करांवर हद्दपार करणेसंदर्भातील कामकाज सुरू आहे.
सदरची कामगीरी ही, अतुल कुलकर्णी पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, प्रितमकुमार यावलकर, अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण, डॉ. अर्जुन भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग, विश्वजीत घोडके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि आशिष कांबळे, पोसई राजेश गोसावी, पोलीस नाईक सचिन इंगळे, पोहवा प्रसाद औटी, पोकॉ दिगंबर भंडरवाड, पोकॉ अनिस शेख यांनी केली आहे.

0 Comments