LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *येत्या पाच वर्षात जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न करू प्रणिती शिंदे यांचे डोंगरगाव येथे प्रतिपादन**खा. प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून मंगळवेढा, अक्कलकोट मोहोळ, तालुक्यात होणार जलसंधारणाची कामे**तसेच गावभेट दौऱ्याअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव, निबोंनी, रड्डे गावांना भेट*



सोलापूर लोकसभा मतदार संघातील दुष्काळ भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलेले होते. दिलेल्या आश्वासनाची वचनपूर्ती करण्यासाठी वचनपूर्तीचे पहिले पाहून म्हणून येत्या पाच वर्षात सोलापूर जिल्हा दुष्काळमुक्त करणार असल्याचे अभिवचन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिले.

खासदार प्रणिती शिंदे ह्या डोंगरगाव येथील साठवण तलावाच्या खोदाईच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या यावेळी ई एफ आय या संस्थेचे संस्थापक अरुण कृष्णमूर्ती सी, काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, अँड रविकिरण कोळेकर, अँड दत्तात्रय खडतरे यांच्या स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून येत्या पाच तारखेपासून सोलापूर जिल्हासह दुष्काळपट्ट्यातील मंगळवेढा तालुक्याच्या २४ गावातील सर्वच जलसंधारणाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. माझ्या प्रयत्नातून मोहोळ, मंगळवेढा, अक्कलकोट तालुक्यात दुष्काळी भागात चेन्नई येथील एनवायरमेंट फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने अंतर्गत जलसंधारणाची कामे सुरू केले जाणार आहेत. पर्यावरण प्रेमी ऑफ इंडिया संवर्धन आणि अधिवास पुनर्संचयन संस्था आहे. जी देशातील १८ राज्यांमध्ये कार्यरत आहे. दरम्यान खासदार प्रगती शिंदे यांनी मतदारसंघातील दुष्काळावर मात करण्यासाठी या संस्थेचे प्रमुख अरुण कृष्णमूर्ती सी. यांच्याशी चर्चा करून जलसंधारणाच्या कामाला गती देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानंतर या संस्थेच्या वतीने सर्वेक्षण करून वाफळे, लक्ष्मी दहिवडी आणि डोंगरगाव या गावातील जलसाठे दत्तक घेऊन त्यांचे पुनर्संचय करणार आहे.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, अँड रविकिरण कोळेकर, शहाजहान पटेल, अमोल म्हमाने, दिनकर खांडेकर, शशिकांत सावंत, संदीप पवार ,यशवंत आकळे, दत्तात्रय खडतरे, समाधान हेंबाडे, तानाजी मोरे ,अनिल मोरे पांडुरंग चौगुले, सुरेश भुसे, भारत हेंबाडे, मधुकर मोरे ,गनिम पठाण ,लक्ष्मण हेंबाडे ,अशोक लटके ,बिरोबा चौगुले ,संजय मस्के, विकास मेटकरी ,ईश्वर बाबर ,नागेश आकळे,किसन हेंबाडे, नंदकिशोर शिंदे, पांडुरंग हेंबाडे, सुखदेव मोरे, आबा हेंबाडे, गणपत आकळे, पिंटू भुसे, तुकाराम खांडेकर, नामदेव ढगे , बिरु घोगरे सरपंच,नवनाथ ढगे, विनायक माळी, प्रमोद माळी,धनाजी सलगर, दत्ता मुठेकर,बिटू खांडेकर, सारजाप्पा ढगे, आंनदा ढगे, अंबादास येडवे, चंद्रकांत ढगे, पंडित कांबळे, भारत ढगे ,हिरालाल शेख,पात्रे महाराज,मारुती पाटील, राजाराम देवकते, सुनील मदने, यशवंत ढगे,
सुरेश कोळेकर, प्रशांत साळे, रविकिरण कोळेकर ,राहुल घुले, सरपंच सरस्वती थोरबोले, उप-सरपंच सारीका खांडेकर, चंद्रकांत पुजारी, भीमराव कांबळे, दत्तात्रय कांबळे,भीमराव सांगोलकर, सौरभ कांबळे, रोहिदास कांबळे, मारुती कांबळे, हनुमंत सपताळे, राजू कांबळे, शशांक थोरबोले, लता कोळेकर, शारदा देवी कांबळे, पंडितराव कांबळे, कमल बनसोडे, जयश्री कांबळे, गणेश शिलेदार ,तलाठी जानकर ,ग्रामसेवक शिवशरण,प्रभाकर खांडेकर पोलीस पाटील जोतिबा कांबळे, शंकर कोकरे, खंडू व्हरे, शंकर लेंगरे, दत्ता गवळी, नानासो कोळेकर, पांडुरंग नवत्रे, भास्कर कांबळे आणि ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments