भटुंबरे येथील सौ.सुनिता लक्ष्मण खांडेकर या लॉकर्स कामानिमीत्त मंगळवारी पंढरपूर अर्बन बँकेचे खवाबाजार येथेे आल्या होत्या. बँकेतील काम आटोपून जाताना त्यांची बँकेची लॉकर्स किल्ली, रोख रक्कम व मौल्यवान वस्तू असणारी पर्स त्यांचेकडून हरविले गेलेचे त्यांना घरी गेल्यावर लक्षात आले.
दरम्यान, बँकेनजीक भादुले चौक येथे सिंहगड कॉलेज येथील कर्मचारी श्री.महेश ज्ञानेश्वर आवताडे रा.गोविंदपुरा यांना सदर पर्स सायंकाळी सहा वाजताचे दरम्यान रस्त्यावर पडलेली सापडली. त्यांनी पर्समधील लॉकर्स की बँकेची असल्याचे कळल्यावर तत्काळ बँकेचे चेअरमन श्री.सतीश मुळे यांचेशी संपर्क साधला. सदर लॉकर्स की वरून बँकेचे कर्मचारी श्री.व्यंकटेश मुळे यांनी सौ.खांडेकर यांचे पत्यावर त्यांचेशी संपर्क करून बँकेची किल्ली व पर्स सुरक्षित असल्याची माहिती दिली.
श्री.महेश आवताडे यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा बद्दल पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन श्री.सतीशजी मुळे यांनी कौतुक करीत त्यांचा सत्कार केला. यावेळी सौ.सुनिता खांडेकर, बँकेचे संचालक श्री.प्रभुलिंग भिंगे, मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे, व्यवस्थापक श्री.गणेश हरिदास, श्री.व्यंकटेश मुळे आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होता. सदर पर्स व त्यावरील सर्व मौल्यवान वस्तू पाहताच सौ.खांडेकर आज्जींनी समाधान व्यक्त करीत श्री.महेश आवताडे यांचे आभार मानले.

0 Comments