*न्यू सातारा डिप्लोमा कॉलेजमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी..... न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँड मॅनेजमेंट (पॉलिटेक्निक) कोर्टी ,पंढरपूर मध्ये छत्रपती शिवरायांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर व उपप्राचार्य प्रा.विशाल बाड सर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना विशाल बाड सर म्हणाले ,छत्रपती शिवरायांचे विचार केवळ शिवजयंतीपुरतेच विचारात न घेता आपल्या दैनंदिन जीवनात त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजेत. पुन्हा सुंदर पसरवू महाराष्ट्राची कीर्ती, शिवरायांची स्मरून मूर्ती, शिवशंभूची घेऊया स्फूर्ती,एकच ध्यास ,जपू महाराष्ट्राची संस्कृती असाही यावेळी संदेश दिला. यावेळी संस्था प्रतिनिधी मा.श्री ज्ञानेश्वर शेडगे साहेब, रजिस्ट्रार श्री.संतोष कवठेकर सर, सर्व विभाग प्रमुख शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
0 Comments