सोलापूर लोकसभा मतदासंघांतील मोहोळ तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून आज रोजी कोन्हेरी या गावास भेट देऊन गावातील जनतेचे प्रणितीताई शिंदे यांनी निवडून दिल्याबद्दल आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि निवेदने स्वीकारले.
यावेळी नागरिक, शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.
आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत.
यावेळी मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार, सरपंच गणेश पांढरे, उपसरपंच बाबुराव शेळके, माजी सरपंच गौरव लवटे, निलेश जरग, शिवाजी गाडे, दशरथ रंदवे, सर्जेराव दाजी चवरे, कविता भोसले, दत्तात्रय सावंत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments