LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*खोटा आणि भूलथापा देणारा अर्थसंकल्प सादर :- चेतन नरोटे*



आज महायुती सरकारने अर्थसंकल्प सादर केला, निवडणुकी वेळी अनेक आश्वासने दिली होती ते सर्व भूलथापा होते हे सिद्ध झाले, शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही, युवकांच्या रोजगार वाढीसाठी काही नाही, महागाई कमी करण्यासाठी कुठलीही तरतूद नाही. लाडक्या बहिणींना २१०० न देता फसविले, गेली कित्येक वर्षे राज्यातील अरबी समुद्रातला छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक यांना करता येईना आणि आग्र्यातले स्मारकाची घोषणा केली यांच्यावर काय भरवसा ठेवायचे. सोलापूर साठी या अर्थसंकल्पात एक रुपयाचा उल्लेख नाही, बोरामनी विमानतळासाठी निधी देतील असे वाटले ते ही नाही, काढा कर्ज, करा खर्च, भरा व्याज हे असेच चालू आहे महाराष्ट्राला कर्जात लोटण्याचे काम सुरू आहे. राज्य दिवाळखोरीच्या उंबऱ्यावर असताना कितीही मोठ्या घोषणा केल्या तरी त्या वास्तवात कशा येतील?

Post a Comment

0 Comments