पंढरपूर (प्रतिनिधी ) : श्रीकृष्णाने पंढरपुरात येताना आपल्या समवेत आणलेला गोवंश धोक्यात असल्याबाबत आणि या गोवंशाला श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती चालवत असलेल्या गोशाळेत आश्रय द्या अशी मागणी करत असलेली पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघ ही सामाजिक संघटना आता अधिकच आक्रमक झाली आहे. कारणही तसेच घडलेय, जी भीती व्यक्त केली जात होती तेच पंढरपुरात घडलेय. अतिशय कमी वय असलेल्या एका गोमातेचा प्लास्टिक खाल्ल्याने पंढरीत मृत्यू झाला, यानंतर महर्षी वाल्मिकी संघाने मयत गायीचे विधीवत अंत्यसंस्कार करा अशी मागणी प्रशासनाकडे केली, परंतु प्रशासनाने मात्र यासाठी असमर्थता दर्शवली. यानंतर संतप्त आणि भावनिक झालेल्या महर्षी वाल्मिकी संघाच्या कार्यकर्त्यांनी सदर गोमातेची पंढरपुरात अंत्ययात्रा काढून तिच्या मृतदेहावर विधीवत अंत्यसंस्कार केले.
याबाबत गणेश अंकुशराव यांनी दिलेल्या माहितीनुसार पंढरपूर शहरातील प्लॅस्टिकचा कचरा खाऊन, पांडुरंगाची तरुण गाय जुन्या नगरपालिकेसमोर मयत झाल्यानंतर, त्या गाईचे अंत्यसंस्कार करण्यास प्रशासनाने असमर्थता दर्शविल्यानंतर, पंढरपूर येथील महर्षी वाल्मिकी संघटनेचे अध्यक्ष गणेश अंकुशराव व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन, गाईची विधीवत पूजा करुन, अंत्ययात्रा काढून, अंत्यसंस्कार केले.
आम्ही वारंवार मंदिर समितीला सांगतोय की साक्षात पांडुरंगा सोबत आलेल्या गोमातेचा वंश टिकला पाहिजे सध्या तो वंश चंद्रभागेच्या पात्रात व पंढरपूर शहरात प्लॅस्टिक व कचरा खाऊन आपली उपजीविका करत आहे कचरा व प्लास्टिक खाल्ल्यामुळे अनेक गोमातांचा प्राणही गेलेला आहे. मंदिर समितीचे करोडो रुपयेचे गोशाळेचे टेंडर असूनही मंदिर समिती त्या गोशाळेमध्ये साक्षात पांडुरंगांना आणलेल्या गोमाता ठेवायला तयार होत नाही, याच्यामागे नेमके कारण काय ? हे मंदिर समितीने स्पष्ट करावं.
आम्ही काल महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने नामदेव पायरी येथे मयत झालेल्या गोमातेची विधिवत पूजा करून तिच्या अंत्ययात्रा काढली आणि साक्षात पांडुरंगाला साकडं घातलं की, " हे पांडुरंगा मंदिर समितीच्या अध्यक्षाला सदस्याला अधिकाऱ्याला सद्बुद्धी दे , आणि ज्या गोमाता मोकाट बेवारस पणे चंद्रभागेच्या पात्रात फिरत आहेत त्यांना मंदिर समितीच्या गोशाळेमध्ये प्रवेश मिळावा यासाठी अधिकाऱ्यांना सद्बुद्धी घाल!"
येणाऱ्या काळामध्ये मंदिर समितीने ह्या गोमाता स्वीकारल्या नाहीत तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करावे लागेल. सगळ्यात वाईट असं वाटतंय की, राज्य शासन केंद्र शासन हिंदुत्ववादी आहे सरकार गोमाते विषयी मोठमोठ्या घोषणा करतं पण प्रत्यक्षात पंढरपूर मध्ये परिस्थिती बघितल्यावर असं वाटतं गो मातेचे प्रेम फक्त तोंडदेखलं आणि कागदावरच आहे का? असा उद्विग्न सवाल सुद्धा यावेळी गणेश अंकुशराव यांनी उपस्थित केला आहे.
..............................................
मा. संपादक पत्रकार साहेब कृपया वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिक, साप्ताहिक, इलेक्ट्रॉनिक मिडीया, युट्यूब न्युज चॅनल वेब पोर्टल वर प्रसिद्ध करुन सहकार्य करावे ही नम्र विनंती.🙏
कळावे आपला
- गणेश अंकुशराव
- मोबाईल - 9370271730
0 Comments