महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ व महाराष्ट्र लेखा संहिता २०११ चे तरतुदीनुसार नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी प्रशासक सचिन इथापे साहेब यांच्याकडे अंदाजपत्रक मंजुरीसाठी सादर केले होते त्यानुसार पंढरपूर नगर परिषदेचे सन २०२४-२५ चे सुधारित व सन २०२५-२६ चे रक्कम रुपये ६,४६,२१७/- चे शिलकी अंदाजत्रकास नगरपरिषदेचे प्रशासक सचिन इथापे साहेब यांनी मंजूरी दिली
पंढरपूर नगर परिषदेचे सन २०२५-२६ ची अंदाजीत वार्षिक उत्पन्न प्रारंभिक शिलकेसह र.रू २६६ कोटी ४ लाख ६ हजार इतके असून खर्च र.रू. २६५ कोटी ९७ लाख ५९ हजार ७८३ अंदाजीत आहे. वर्षाखेरीस रक्कम रुपये ६ लाख ४६ हजार २१७ इतकी अंदाजे शिल्लक राहील.
सदर अंदाजपत्रकामध्ये 15 वित्त आयोग, वैशिष्ट्यपूर्ण योजना, विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना, नगरोत्थान राज्यस्तर, नगरोत्थान जिल्हा स्तर, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, अग्निशमन सुरक्षा अभियान, यमाई तलाव सुशोभीकरण, प्राथमिक सोयी सुविधा विकास, मूलभूत सोयी सुविधा, स्वच्छ भारत अभियान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजना, पाणीपुरवठा विषयक कामे, रस्ते दुरुस्ती, रस्ते बांधणी, नवीन गटारी यांची तरतूद करण्यात आलेली आहे. सदर अंदाजपत्रकातील ठळक तरतूदी पुढील प्रमाणे आहेत
महिला बालकल्याण विकास २२ लाख
दिव्यांग निधी २२ लाख
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजना ५ कोटी
नगरोत्थान राज्यस्तर रस्ते विकास ३० कोटी
नगरोत्थान राज्यस्तर पाणी पुरवठा २९ कोटी ७६ लाख
नगरोत्थान राज्यस्तर भुयारी गटार योजना ३० कोटी
नगरोत्थान जिल्हास्तर ५ कोटी
दलितेतर वस्ती सुधारणा योजना २ कोटी
प्रधानमंत्री आवास योजना ३ कोटी
रमाई आवास योजना ३ कोटी
माझी वसुंधरा अभियान ३ कोटी
रोडलाईट पाणीपुरवठा जलशुद्धीकरण केंद्र मलसिद्धीकरण केंद्र विज बिल १० कोटी ४१ लाख
स्मशानभूमी सुधारणा २५ लाख
गटार व नाले २५ लाख
काँक्रीट रस्ते १ कोटी
डांबरी रस्ते १ कोटी
अशी तरतूद अंदाजपत्रकामध्ये मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव व लेखापाल करुणा शेळके यांनी दिली
पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर
0 Comments