LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपुरात ओला मावा आणि पान मसाला विक्री करणारांवर अन्न व औषध प्रशासनाचा कारवाईचा फार्स, मोठे मासे का पकडत नाहीत? यांना माल पुरवणारे डीलर आधी पकडा - गणेश अंकुशराव




पंढरपूर (प्रतिनिधी) : प्रतिबंधीत 
असलेला ओलामावा, सुगंधित तंबाखू व पान मसाला खुलेआम विकणाऱ्या पाच दुकानांत धाड टाकून ४८ हजार २७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहा. आयुक्त उमेश भुसे यांनी पाच दुकान मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे समजतेय, परंतु यांची हा केवळ कारवाईचा फार्स असल्याची टीका पंढरीतील समाजसेवक महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली असून या छोट्या पानटपरी धारकांना माल पुरणा-या डीलर्स ना आधी पकडा असेही ते म्हणाले आहेत.

 प्रतिबंधीत असलेला ओलामावा, सुगंधित तंबाखू व पान मसाला विक्री केला जातोय, हे कटु सत्य आहे, परंतु याहूनही धक्कादायक बाब म्हणजे या पानटपरी धारकांना ओला मावा बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखू , पानमसाला हा माल कुठून येतो? याचा सखोल तपास करून हा माल पुरवणारे जिल्हा व तालुका पातळीवरच्या डीलर्स लोकांना आधी पकडायला पाहिजे. हे मोठे मासे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या गळाला का लागत नाहीत? असा सवाल गणेश अंकुशराव यांनी उपस्थित केला आहे.

यामागे खरे आरोपी हे छोटे छोटे पानटपरी धारक नसून यांना माल पुरवणारे लोक हे खरे आरोपी आहेत, यांच्या मागे खुप मोठी यंत्रणा आहे, लाखो करोडो रूपयांची उलाढाल यामधुन होत आहे, महाराष्ट्रात बंदी असल्यामुळे शेजारच्या कर्नाटक राज्यातून हा सर्व माल अवैधरित्या महाराष्ट्रात आणला जातो आणि इथल्या एजंटांमार्फत तो छोट्या छोट्या पानटपरी धारकांपर्यंत पोहचवला जातो. एकुणच यामागे कांही राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांचे सुध्दा लागेबांधे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पंढरीत जो पान टपरी धारकांवर कारवाई केल्याचा फार्स केला जातोय तो केवळ तेवढ्यापुरताच आहे, कारण जोपर्यंत बाहेरच्या राज्यातून बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू व तत्सम पदार्थांची अवैधरित्या महाराष्ट्रात होणारी आयात रोखली जाते नाही, आणि महाराष्ट्रातील अशा मालांचा पुरवठा करणाऱ्या सगळ्या एजंटांच्या मुसक्या आवळल्या जात नाहीत तोपर्यंत तरी हे प्रकार थांबणार नाहीत. असे मत गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले आहे.

तरूणांना व्यसनाधीन बनवण्यासाठी खरे कारणीभुत तर हे मोठे मासे असुन अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांनी आधी यांच्यावर छापे टाकून जाळ्यात घ्यायला हवे तरंच यामागे कुणाकुणाचे हात गुंतले आहेत ते जनतेसमोर येईल असा गौप्यस्फोट ही गणेश अंकुशराव यांनी केला आहे.
...................................

मा. संपादक पत्रकार साहेब कृपया वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिक, साप्ताहिक, इलेक्ट्रॉनिक मिडीया, युट्यूब न्युज चॅनल वेब पोर्टल वर प्रसिद्ध करुन सहकार्य करावे ही नम्र विनंती.🙏

कळावे आपला 
- गणेश अंकुशराव 
- मोबाईल - 9370271730

Post a Comment

0 Comments