LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*विकृत नागडा मंत्री जयकुमार गोरे ला सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने कपड्याचा आहेर**पालकमंत्री जयकुमार गोरे ची मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करण्याची मागणी



सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने, खासदार प्रणितीताई शिंदे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली,
          👉 महिलेशी अश्लील पणे वागून त्रास देणाऱ्या विकृत, निर्लज्ज पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा निषेध करण्यासाठी, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांच्या निषेध आंदोलन करण्यात आला. 
तसेच यावेळी विकृत नागडा मंत्री जयकुमार गोरे ला पूर्ण कपडे व साडी चोळी चा आहेर करण्यात आला.

यावेळी बोलताना महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे म्हणाले की, विकृत पालकमंत्री जयकुमार गोरे यांने एका महिलेला पाठवलेले स्वतःचे नग्न अवस्थेतील अनेक फोटो पाठवून त्रास दिला. अश्या नालायक स्त्रीलंपट मंत्री जयकुमार गोरे यांची मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करावी. आणि या नागड्या मंत्र्याला महिला काँग्रेसच्या वतीने पूर्ण कपडे व साडी चोळीचा आहेर करण्यात आला. त्याचप्रकारे राज्यभरात पूजा चव्हाण, बदलापूर, करुणा मुंडे शर्मा, स्वारगेट बलात्कार, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत छेडछाड, सरपंच देशमुख हत्या प्रकरण, जालना येथील कैलास बोराडे यांना गरम लोखंडी सळईने चटके देऊन अमानुषपणे मारहाण केली. राज्यातील महिला सुरक्षित नाहीत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पण सत्ताधारी महायुती सरकार एकमेकांचे पाय खेचण्यात मग्न आहेत यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.

या आंदोलनात सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे, माजी अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, सुमन जाधव, शोभा बोबे, प्रा. संघमित्रा चौधरी, ज्योती गायकवाड, रेखा बिनेकर, मुमताज तांबोळी, आशा गायकवाड, मुमताज शेख, विजयालक्ष्मी झाकणे, सलीमा शेख, अनिता भालेराव, छाया हिरवटे, पूनम भालेकर, अनिता गायकवाड, मंगल जाधव, गौरी यदीमनी, तिरुपती परकीपंडला, भीमाशंकर टेकाळे, अशोक कलशेट्टी, सागर उबाळे, विवेक कन्ना, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, एजाज बागवान, धीरज खंदारे, भीमराव शिंदे, धोंडप्पा तोरनगी, हाजी मलंग नदाफ, धैर्यशील बाबरे, शिवाजी साळुंखे, भीमा गायकवाड, शिवाजी साळुंखे, अभिलाष अच्युगटला यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments