पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ नर्मदाताई लक्ष्मण धनवडे यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करणे, अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा यातून मुक्तता करणे, बालविवाह रोखाणे, महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे, मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, महिलांचा ताणतणाव कमी करून आयुष्यमान वाढवणे यासाठी खेळ,गाणी, गप्पा,चर्चा, बोधकथा यांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या व महिला कर्मचारी यांनी येणाऱ्या प्रत्येक महिलेचे स्वागत केले, प्रमुख मान्यवरांच्या हस्ते माता जिजाऊ,माता सावित्री, माता रमाई, माता अहिल्या यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन या महान माते मातांचा गौरवोद्गार करण्यात आला. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी श्री जन्माचे स्वागत म्हणून मुलीला जन्म देणाऱ्या मातेला बाळाचे संगोपन किट देऊन सन्मानित करण्यात आले.
आरोग्य विभागाकडून महिलांच्या आरोग्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये शुगर,बीपी, हिमोग्लोबिन, यांच्या तपासण्या करून योग्य मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. एकनाथ बोधले सर व प्राथमिक आरोग्य केंद्र तुंगत च्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भानवसे मॅडम यांनी स्वच्छता, आरोग्य, व शुद्ध पाणी यातील महिलांचे योगदान, त्यावर करावयाची उपायोजना यावर व्याख्यान दिले. त्यानंतर महिलांचा ताणतणाव कमी करण्यासाठी पांडुरंग सह. साखर कारखान्याचे संचालक मा.श्री.लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळ,गप्पा, गोष्टी,गाणी यांचा बहारदार कार्यक्रम
होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच्या आयोजन केले. या कार्यक्रमाचे सादरीकरण उत्कृष्ट संवाद तज्ञ श्री.शहाजी देशमुख सर यांनी केले. यावेळी प्रथम बक्षीस - पैठणी,द्वितीय बक्षीस - नथ
तृतीय बक्षीस - कुक्कर व इतर उत्तेजनार्थ बक्षीसे सूर्यनारायण मेडिकल स्टोअर्स व श्री संभाजी भोसले यांच्या वतीने देण्यात आली. त्यानंतर ग्रामपंचायतच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला.
अशाप्रकारे अनोखे उपक्रम घेऊन महिलांना भयमुक्त, सक्षम व प्रभावशाली बनवण्यासाठी ग्रामपंचायत ने केलेल्या कार्यक्रमाचे महिलांनी कौतुक केले. हा कार्यक्रमसाठी डॉक्टर स्वप्नाली शिंदे, आरोग्य सेविका त्रिशाला जाधव , अशा सेविका पुष्पाताई हाडमोडे, उमा बनसोडे, लक्ष्मी हाडमोडे शिक्षिका बामणे मॅडम, अंजु करळे मस्के , उत्पात मॅडम, मेघा घाडगे, अंगणवाडी ताई शांता बनसोडे, अन्नपूर्णा भडकुंबे, उषा कोले , सुजाता जाडकर ,प्रितम नलवडे, शीतल घाडगे, crp शोभा आहेर, रुपाली गुंड , यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण प्राध्यापक दत्तात्रय मस्के सर, मा. सरपंच बळवंत धनवडे, विठ्ठल माने, विष्णू माने, ज्ञानेश्वर बरडे, ग्रामपंचायत सदस्य अलका माने, अमृता गायकवाड यांचेसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी संतोष गायकवाड यांनी केले तर मुख्याध्यापक हरिदास सर यांनी सर्वांचे आभार मानले.
0 Comments