LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सहकार शिरोमणी कारखाना कार्यस्थळावर राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ



चंद्रभागानगर, भाळवणी दि.04:- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे मार्गदर्शनखाली राष्ट्रीय औधौगिक सुरक्षा सप्ताहाचे नियोजन केले असून, त्याचा शुभारंभ कारखान्याचे टेक्निकल जनरल मॅनेजर पी.टी तुपे यांचे शुभहस्ते आज सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.

          यावेळी कारखान्याचे सुरक्षा अधिकारी बाबासो पिसे यांनी कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व कामगार यांना सुरक्षा सप्ताहाचे महत्व सांगुन यावेळी सुरक्षिततेची शपथ घेण्यात आली. सदर सप्ताह 4 मार्च ते 11 मार्च 2025 पर्यत असून यामध्ये कारखान्यातील कर्मचारी, कामगार यांना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.


सदर प्रसंगी कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे, डेप्यु.जनरल मॅनेजर कैलास कदम, प्रोडक्श्न मॅनेजर व्ही.डी.आडत, परचेस ऑफिसर सी.जे.कुंभार, ऑफिस सुपरीटेंडंट ज्ञानेश्वर कुंभार, हेड टाईम किपर संतोष काळे, गोडावुन किपर माने, स्टोअर किपर जावेद मुजावर, इनचार्ज सुरक्षा अधिकारी मनसुब सय्यद  व इंजिनिअरींग व उत्पादन विभागाकडील सर्व कामगार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments