LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपुरात नगरपालिकेनं दुर्लक्ष केलेल्या रस्त्यावरील खड्ड्यात होळी पेटवली, महर्षी वाल्मिकी संघाचं आणखी एक हटके आंदोलन



पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपुरात आज होळीच्या सणादिवशी पंढरपुर मधील हटके आंदोलन करणारी संघटना म्हणून ओळख असलेल्या महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने आणखी एक वेगळं आंदोलन केले आहे.

पंढरपूर नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीसमोरच्या रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात होळी पेटवून महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव व कार्यकर्त्यांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या निष्क्रीय प्रशासन व अधिका-यांच्या नावाने बोंब ठोकली.

यावेळी सर्वप्रथम सर्व कार्यकर्त्यांनी परंपरेनुसार होळी चं पुजन केलं आणि होळी समोर घोषणा देत बोंबाबोंब केली.

यासंदर्भात बोलताना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव म्हणाले की, सध्या पंढरपूर नगरपरिषदेचा संपुर्ण कारभार प्रशासन बघतंय, परंतु या प्रशासकीय अधिकारी व एकुणच नगरपरिषद प्रशासनाचे पंढरपूर शहरातील स्वच्छता, रस्ते आदी मुलभूत सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. 

पंढरपूर शहर हे तिर्थक्षेत्र असुनही शहरात सर्वत्र धुळीचे व घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे, शहरातील अनेक मार्गांवर मोठमोठे खड्डे आहेत परंतु याकडे प्रशासकीय अधिकारी डोळेझाक करत आहेत.

पंढरपूर नगरपरिषदेच्या जुन्या पुरातन इमारतीच्या समोरंच गेल्या दोन वर्षांपासून एक भला मोठ्ठा खड्डा पडला असून या खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडले आहेत, पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साठल्यामुळे पंढरपुरकरांसह नागरिकांसाठी हा खड्डा अतिशय धोकादायक ठरत आहे. आम्ही वारंवार हा खड्डा बुजवण्याची विनंती करूनही नगरपालिका प्रशासनाला जाग येत नाही. त्यामुळे आज याच खड्ड्यात होळी पेटवून होळीचा सण साजरा करत असतानाच पंढरपूर नगरपरिषदेच्या निष्क्रीय प्रशासन आणि अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध केला आहे. 

वास्तविक पंढरपूर हे तिर्थक्षेत्र असल्यामुळे शासनाकडून कोट्यावधी चा निधी पंढरपूर नगरपरिषदेला येतो, याचबरोबर नागरिकांकडूनही कररूपाने मोठी कमाई होते तरी सुद्धा येथील मुलभूत सोयी सुविधा नगरपालिका प्रशासन पुरवू शकत नसेल तर हा कोट्यावधींचा जमा झालेला निधी कुठं जातो ? असा खडा सवाल ही यावेळी अंकुशराव यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी गणेश अंकुशराव, रामभाऊ सुरवसे, सुरज कांबळे, आण्णा अधटराव, मारूती अधटराव, यश अंकुशराव, अप्पा करकमकर, माऊली कोळी, सुरज अभंगराव, बालाजी कोळी, कैलास कांबळे, आबा अधटराव, प्रेम अधटराव, श्रावण कोताळकर, विनायक अभंगराव, आण्णाप्पा मंगुडे, नितीन कडलासकर, भैया तारापूरकर, संतोष थोरात, प्रकाश जोशी यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
..............................................

मा. संपादक पत्रकार साहेब कृपया वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिक, साप्ताहिक, इलेक्ट्रॉनिक मिडीया, युट्यूब न्युज चॅनल वेब पोर्टल वर प्रसिद्ध करुन सहकार्य करावे ही नम्र विनंती.🙏

कळावे आपला 
- गणेश अंकुशराव 
- मोबाईल - 9370271730

Post a Comment

0 Comments