पंढरपूर. .*आज समस्त सोनार समाज उपाध्यक्ष या पदासाठी श्री.लंकेश काकासाहेब बुराडे यांचा ऐकमेव अर्ज दाखल झाल्याने उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होणार हे आगदी निश्चित झाले आहे ...
तर सोनार समाज अध्यक्ष पदा साठी दोन अर्ज आल्याने अध्यक्ष पदा साठी निवडणूक लागण्याची शक्यता आहे अध्यक्ष पदाची निवडणूक ही बिनविरोध व्हावी या साठी समाजातील मातब्बर प्रयत्न करीत आसून त्यात यश आले तर समाज अध्यक्षाची ही निवडणूक बिनविरोध होईल
.समस्त सोनार समाज अध्यक्ष उपाध्यक्ष पदा साठी निवडणूक जाहीर करण्यात आली आसून मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संस्था अध्यक्ष अरूणशेठ मंजरतकर त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजयशेठ ढाळे व राजेश जोजारे हे काम पाहाणार आहेत दि २३\ ०२\२०२५ रोजी सभासदांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली
दि २४\०२\२०२५ ते २८ \०२\२५ पर्यंत अध्यक्ष उपाध्यक्ष पदाकरीता समाज सभासदांमधून आलेले उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत तर ०२\०३\२०२५ रोजी सहा वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे दि ०३\०३\२०२५ रोजी समाज अध्यक्ष उपाध्यक्ष पदा साठीच्या उमेदवारांची अंतीम यादी जाहीर होणार असून
दि ९\०३\२०२५ रोजी प्रत्यक्षात सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत मतदानास सुरुवात होणार आहे.
आणी त्याच दिवशी सायंकाळपर्यंत मतमोजणी होऊन समाज अध्यक्ष उपाध्यक्ष पदी निवडून आलेल्या उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे व त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा संस्था अध्यक्ष अरूणशेठ मंजरतकर यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात येणार आहे....
0 Comments