LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपुरातील आमसभेत श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती चे अधिकारी गैरहजर, गैरकारभाराविरुद्ध बोलायचे तरी कुणाला? - गणेश अंकुशराव



पंढरपूर (प्रतिनिधी) : काल पंढरपूर पंचायत समिती मध्ये माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा संपन्न झाली, या आमसभेला माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, पंढरपूर चे आमदार समाधान आवताडे, मोहोळ चे आमदार राजु खरे व सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या आमसभेत प्रशासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी सुध्दा उपस्थित होते, परंतु या आमसभेत श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती चा एकही प्रशासकीय अधिकारी अथवा सदस्य उपस्थित नसल्यामुळे मंदिर समिती च्या गैरकारभारावर आमसभेत कुणाला जाब विचारायचा? हा प्रश्न आम्हाला पडला आहे. अशी माहिती पंढरपूर मधील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिली आहे. काल पंढरपूर पंचायत समिती मध्ये आमसभेत गणेश अंकुशराव यांनी आमदारांसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

काल झालेल्या आमसभेत रात्री गणेश अंकुशराव यांनी मंदिर समिती मार्फत पंढरपुरातील स्थानिक नागरिकांना दर्शनासाठी ची वेळ वाढवून दिली जात नाही, मंदिराचे संवर्धनाचे कामात घोटाळा आहे, मंदिर समितीकडून महिला भाविकांसाठी अत्यावश्यक सुविधा पुरवल्या जात नाहीत, विठ्ठल रूक्मिणीमाता विवाह सोहळ्यात देवाला बाशिंग बांधले गेले नाही, देवाच्या जलद दर्शनासाठी सोडणारे एजंट सापडले त्यांचेवर कारवाई झाली, पण दोषी अधिकारी मोकाट आहेत, साक्षात पांडुरंगासोबत विष्णु पदावर आलेला गोवंश चंद्रभागेच्या पात्रात मोकाट फिरत असुन यांचे अस्तित्व धोक्यात आहे, याकडे मंदिर समिती दुर्लक्ष करत आहे. मंदिर समितीचं माघी वारीत मागील वर्षी पेक्षा उत्पन्न का घटलंय ? मंदिर समिती च्या स्वच्छता टेंडरमध्ये मोठा घोटाळा आहे याकडे राजकीय नेते दुर्लक्ष का करत आहेत? यासह अनेक प्रश्न उपस्थित करून चारही आमदारांसमोर मंदिर समितीच्या गैरकारभाराचा पाढा वाचून दाखवला, परंतु यावर स्पष्टीकरण देण्यासाठी मंदिर समिती चे एकही जबाबदार अधिकारी अथवा सदस्य उपस्थित नसल्यामुळे अंकुशराव यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, मंदिर समिती बरखास्त करा, इथं भ्रष्टाचार फोफावलाय, अधिकारी मस्तवाल बनलेत यांना निलंबित करा अशा मागण्या चारही आमदारांसमोर लावून धरत काल रात्री आमसभेत पंढरपूर पंचायत समिती परिसर दणाणून सोडला होता.

पंढरपूर नगरपरिषदेच्या जुन्या पुरातन इमारतीकडे व नगरपालिका च्या दवाखाना असलेल्या इमारतीकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने या ऐतिहासिक इमारतींचे वास्तव्यास धोका निर्माण झाला आहे. हा मुद्दा ही गणेश अंकुशराव यांनी उपस्थित केला.

यावेळी चारही आमदारांनी याचा पाठपुरावा करून योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन दिले. अशी माहिती गणेश अंकुशराव यांनी दिली आहे.
................

मा. संपादक पत्रकार साहेब कृपया वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिक, साप्ताहिक, इलेक्ट्रॉनिक मिडीया, युट्यूब न्युज चॅनल वेब पोर्टल वर प्रसिद्ध करुन सहकार्य करावे ही नम्र विनंती.🙏

कळावे आपला 
- गणेश अंकुशराव 
- मोबाईल - 9370271730

Post a Comment

0 Comments