LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाबरोबरच नवीन व सुधारित कौशल्ये आत्मसात करावीत -प्राचार्य डॉ.उत्तरेश्वर मुंढे



स्वेरीत ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ संपन्न
पंढरपूर- 'शास्त्रज्ञ डॉ.सी. व्ही. रामन यांच्या संशोधन कार्याची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्राकडे वाटचाल करण्याची सध्या गरज आहे. यासाठी आपल्या देशाची अर्थव्यवस्थाही खुली आहे. सध्या जागतिकीकरणाचे वारे प्रचंड वेगाने वाहत आहे. या जागतिकीकरणामध्ये तंत्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना, तरुणांना रोजगाराच्या चांगल्या संधी देखील उपलब्ध झाल्या आहेत. परंतु विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाबरोबरच नवीन व सुधारित कौशल्ये आत्मसात करावीत, हीच सध्या काळाची गरज आहे.' असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे व पंढरपूर मधील विवेकवर्धिनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तरेश्वर मुंडे यांनी केले.
        गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग(ऑटोनॉमस) च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये 'राष्ट्रीय विज्ञान दिन' साजरा करण्यात आला. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या 'राष्ट्रीय विज्ञान दिन' कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. उत्तरेश्वर मुंडे मार्गदर्शन करत होते. त्यांनी नोबेल पारितोषक विजेते शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रामन यांचे संशोधन कार्य आणि जेनेटिक्स मधील सूत्रे विद्यार्थ्यांसमोर सविस्तर मांडली. पुढे बोलताना प्राचार्य डॉ. मुंढे यांनी गोपाळपूरच्या माळरानावरील शैक्षणिक नंदनवन म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या आणि स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले. शिक्षण क्षेत्रात विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबविताना विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक कौशल्य विकसित होते. यामुळे स्वेरीचे शैक्षणिक कार्य अनुकरणीय आहे.’ असे सांगून त्यांनी स्वेरीतील तंत्रशिक्षणाचा गौरव केला. विभागाचे सहप्रमुख डॉ. एन.यु. कौटकर यांनी प्रास्ताविकात मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे योगदान आणि आयआयसीच्या उद्योजकता विकास, संशोधन प्रात्यक्षिक आणि विकास यासारख्या विविध उपक्रमांना संबोधित करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांनी विद्यार्थ्यांना 'आयआयसी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा सल्ला दिला आणि शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांच्या विज्ञानातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली. यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन (मेसा) आणि अमेरिकन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेटिंग आणि एअरकंडीशनींग (एश्रे) मधील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. यामध्ये निकिता सुर्यवंशी आशुतोष जाधव, सिद्धी मोरे, नुपूर अचलारे, अल्फिया इनामदार, गायत्री गायकवाड, कल्याणी करंजकर, साक्षी चौघुले आणि स्वप्नील भोंगे यांचा प्रमुख सहभाग होता तसेच या कार्यक्रमात एमसीडीचे सेवानिवृत्त अधिकारी दत्ता मुळे, जेष्ठ पत्रकार अरविंद जोशी, एमसीडीचे विभागीय अधिकारी सुरेश उमाप तसेच जवळपास २५० विद्यार्थी उपस्थित होते. विभागप्रमुख डॉ. एस.बी. भोसले, आयआयसी चे समन्वयक प्रा.एस.एल. साठे, प्रा. एस.एन. मोरे यांच्यासह इतर प्राध्यापकांच्या सहकार्याने हा 'राष्ट्रीय विज्ञान दिन' कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिका गव्हाणे व अक्षता खताळ यांनी केले तर स्वेरीच्या आयआयसीचे अध्यक्ष डॉ. दिग्विजय रोंगे यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments