LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आरोग्य चांगले राहण्यासाठी शरीराला व्यायामाची गरज......... निरोगी आणि तंदुरुस्त आरोग्य राहण्यासाठी आहाराबरोबरच शरीराला व्यायामाची खूप गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य प्रा.विक्रम लोंढे सर यांनी केले . न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँड मॅनेजमेंट (पॉलीटेक्निक) कोर्टी,

* पंढरपूर मध्ये विद्यार्थ्यांसाठी जिमखाना सुरू करण्यात आला असून त्या जिमखान्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना लोंढे सर म्हणाले, तब्येत चांगली होण्यासाठी अनेक अनेकजण व्यायाम करतात. व्यायामामुळे हृदयाची गतीही चांगली होते, स्मरणशक्ती सुधारते, हृदयातल्या मांसपेशी मजबूत होतात तसेच व्यायामामुळे आलेल्या घामामुळे शरीरात असलेला बॅक्टेरिया दूर होतो आणि त्यामुळे आपली आजारी पडण्याची शक्यता खूपच कमी राहते. नियमित हालका व्यायाम त्वचेसाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्यामुळे त्वचेची लवचिकता ही सुधारते .या जिमखान्याच्या सुविधेचा सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहनही लोंढे सर यांनी केले. यावेळी संस्था प्रतिनिधी मा.श्री. ज्ञानेश्वर शेडगे साहेब, उपप्राचार्य व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विशाल बाड सर , रजिस्ट्रार श्री .संतोष कवठेकर सर ,सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments