सोलापूर:- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या शिफारसीनुसार सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी न्यू बुधवार पेठ प्रभाकर महाराज मंदिर पंधे अपार्टमेंट येथील रहिवासी चाटी गल्ली येथील प्रसिद्ध व्यापारी हार्दिक बियाणी यांची निवड करण्यात आली असून काँग्रेस भवन सोलापूर येथे हार्दिक बियाणी यांच्या निवडीचे पत्र सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी महिला अध्यक्षा प्रमिला तूपलवंडे, हेमाताई चिंचोलकर, मिडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, संजय गायकवाड, अनिल जाधव, सुभाष वाघमारे,
आकाश वाघमारे, सचिन कांबळे, सचिन सुरवसे, संजय वाघमारे, महेश शिवशरण, सिद्धार्थ वाघमारे, सुमन जाधव, शोभा बोबे, मुमताज तांबोळी, ज्योती गायकवाड, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments