करकंब पोलीस ठाणेकडील सपोनि /सागर कुंजीर यांचे मार्गदर्शनखाली गोपनिय बातमीदार यांचे मार्फतिने पोलीस हवालदार आर आर जाधव व पोलीस हवालदार संदेश शिकतोडे यांनी गुप्त माहीती मिळवली होती की मौजे जळोली,ता.पंढरपूर या गावाचे शिवारातील राजेंद्र रामराव नरसाळे,रा.जळोली ता. पंढरपूर यांनी गांजाचा अवैध बेकायदेशीर साठा केलेला आहे.त्याप्रमाणे करकंब पोलीस ठाणेकडील स.पो.नि. सागर कुंजीर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले पंढरपुर विभाग यांचे मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक शंकर उमाकांत पटवारी नेमणुक श्री विठठ्ठल मंदीर सुरक्षा शाखा पंढरपुर यांचेसोबत पोलीस पथकाने सकाळी छापा टाकुन कारवाई केली असता खालील नमुद मुद्देमाल आरोपीकडे मिळुन आला आहे. एकुण ५,६५,६४०/- रू किंमतीचा एकुण २८.२८२ किलो ग्रॅम वजनाचा गांजा वनस्पतीचे पाने,फुले,बोंडे असा मुद्देमाल आरोपी राजेंद्र रामराव नरसाळे याचे राहते घरी मिळुन आलेला आहे.
सदरच्या प्रकरणी आरोपी राजेंद्र रामराव नरसाळे रा.जळोली यांचेवर गुंगीकारक औषधे द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) ii (क) प्रमाणे सरकारतर्फे पोलीस हवालदार आर आर जाधव यांनी तक्रार देवुन गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी अटक करण्यात आलेली असुन सदरच्या गुन्ह्याचा तपास सुरु आहे.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपुर विभाग डॉ.अर्जुन भोसले यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली आहे.
सदरच्या कामगिरी सपोनि/सागर कुंजीर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार / १८९७ आर आर जाधव यांनी फिर्याद दिलेली असुन सदरच्या कारवाई मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले पंढरपुर विभाग यांचे मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक/शंकर उमाकांत पटवारी नेमणुक श्री विठठल मंदीर सुरक्षा शाखा पंढरपुर,सपोनि सागर कुंजीर, पोहेकॉ 1897 जाधव,पोहवा /१०७० राजकर,पोहवा/४२४ घोळवे,पोहवा/९९० भोसले, पोहवा /१५६७ शिकतोडे, पोहवा /२३८ सावंत, पोकॉ/१४३ ननवरे, चापोकॉ/डी २६ गात, चापोहवा/ब.नं.३१६ ननवरे सह होम/शिंदे यांनी केलेली आहे. पुढील तपास पोउपनि/निलेश गायकवाड हे करीत आहेत.
0 Comments