. पंढरपूर, येथील छत्रपती संभाजी चौकात सोनाली ब्युटी पार्लर यांच्या सहकार्याने जागतिक महिला दिनानिमित्त महिला साठी विविध खेळ खेळविले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रणिता भगिरथ भालके, अमॄता प्रणव परिचारक ह्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमात संगीत खुर्ची, प्लास्टिक ग्लास टेबल वरुन उचलणे,बाॅल ने बाटली पाडणे, बाॅल स्टार्स आदि विविध प्रकारचे खेळ महिला साठी खेळविले होते. संगीत खुर्ची मध्ये प्रथम क्रमांक पटकावला सोनाली किशोर काकडे यांनी त्यांना सोनाली प्रज्योत भोसले यांनी पैठणी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. प्लास्टिक ग्लास टेबल वरून उचलणे या खेळाचा मान गिता माऊली लाडवाणी यांना मिळाला.त्यांना प्रथम क्रमांक बक्षीस म्हणून सरबत सेठ देऊन गौरविण्यात आले.बाॅल ने बाटली उचलणे या स्पर्धेत देवमारे प्रथम क्रमांक पटकाविला त्यांना ही सरबत सेठ देऊन गौरविण्यात आले.खेळाच्या शेवटी बाॅल स्टार्स मध्ये प्रथम क्रमांक उषा सिताराम बेसुळके यांनी प्रथम क्रमांक पटकाविला त्यांना ही सरबत सेठ देऊन गौरविण्यात आले. या खेळा मध्ये शंभर हुन अधिक महिला नी भाग घेतला होता. या वेळी कल्पना किशोर भोसले, भाग्यश्री प्रदिप भोसले, राणी प्रमोद भोसले, सपना प्रितम भोसले, सोनाली तेजेस भोसले, मोनाली आकाश भोसले.या वेळी उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिना चोडोले, गीता चाडोले , ऐश्वर्या चोडोले, हकीम, राहिरकर, परीश्रम घेतले
0 Comments