LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

शनिवारपासून भोसे येथे अखंड हरिनाम सप्ताह शिवपुराण कथेचे आयोजन


पंढरपूर (प्रतिनिधी)

शनिवार दि. १५ मार्चपासून
भोसे येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात होणार असून , या सप्ताहात शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवपुराण कथेचा नागरिकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत तुकाराम महाराज अमृत महोत्सवी वैकुंठगमन सोहळ्याच्या आयोजकांकडून करण्यात आले आहे.

भोसे येथे दरवर्षीच श्री संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त
अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.
शनिवारपासून सुरू होणाऱ्या या सोहळ्याची सुरुवात ह भ प बापूसाहेब देहूकर यांच्या हस्ते विणा पूजन करून होणार असून , याचवेळी श्री संत देव मामलेदार यशवंतराव महाराज यांची महाआरती आ. अभिजीत पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. या सोहळ्यासाठी येथील देव मामलेदार चौकात भव्य शामियाना उभारण्यात आला आहे.

या सप्ताहात दुपारी तीन ते सहा या वेळेत , हभप प्रकाश महाराज साठे शिवपुराण कथा होणार आहे. सप्ताहात दररोज काकडा आरती , गाथा भजन , महिला भजन , शिवपुराण कथा, हरिपाठ
आणि शेवटी महाप्रसाद असा या सप्ताहाचा दिनक्रम असून , व्यासपीठ चालक हभप हरी महाराज खुणे आणि हभप ज्ञानेश्वर महाराज पवार 
यांच्यावर ही जबाबदारी
सोपविण्यात आली आहे.

या सप्ताहात येणाऱ्या भाविक मंडळींना दररोज महाप्रसाद
पुरविण्याची जबाबदारी नारायण संभाजी माळी , ज्ञानेश्वर हनुमंत थिटे , संजय वैजनाथ कोरके, अजय शंकर जाधव , बाळकृष्ण केरू थिटे , मधुकर माळी, नितीन सरडे , बळीराम तळेकर , तानाजी तळेकर , नितीन आणि प्रवीण खटके , संजय तळेकर, भास्कर तळेकर आणि श्रीधर तळेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

भोसे येथील श्री संत देव मामलेदार यशवंतराव महाराज
चौकात होणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताहास अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित रहावे , असे आवाहन , अखंड हरिनाम सप्ताहाचे चालक आणि भोसे ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.


*लोकप्रिय कीर्तनकारांची उपस्थिती*

या सप्ताहात मोठी किर्तनसेवा होणार असून झी टॉकीज मनमंदिरा फेम हभप माऊली महाराज पठाडे , सागर महाराज बोराटे , हरी महाराज नामदास ,
प्रभू महाराज घाडगे , सुधाकर महाराज इंगळे, एकनाथ महाराज हंडे , बाळासाहेब महाराज देहुकर , भागवताचार्य
रामेश्वर महाराज शास्त्री आणि हभप प्रकाश महाराज साठे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Post a Comment

0 Comments