पंढरपूर तालुक्यातील मौजे कोर्ती येथे ,
राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांची जयंती प्रबोधनात्मक कार्यक्रमातून संपन्न झाली.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. भालचंद्र कांबळे ( सोलापूर जिल्हा प्रभारी ,बसपा) यांनी मार्गदर्शन केले.
तसेच सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मां. प्रणव परिचारक साहेब, कोर्टी गावाचे युवक कार्यकर्ते मा.राजू पवार, मां. रघु पवार ( माजी सरपंच), तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, इतर सर्व संघटना व पक्ष पदाधिकारी उपस्थित होते, त्याच प्रमाणे मोठ्या प्रेमात महिला, युवक, शालेय विद्यार्थी उपस्थित होते ,
सदर प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांची आकर्षक भाषणे ही घेण्यात आली.
तसेच उपस्थित मान्यवर व गावातील प्रमुख तरुण,युवक यांनीही थोडक्यात मनोगत वेकत केले.
तसेच कार्यक्रम प्रसंगी वक्ते या नात्याने मा. कांबळे साहेब यांनी बुद्ध ते डॉ आंबेडकर ते मान्यवर कांशीराम जी पर्यंत चां समतेचा लढा कसा लढला गेला ,त्यातील चढ उतार या संधी सखोल मत मांडले.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन युवक कार्यकर्ते सुनील ढोपे यांनी केले ,प्रास्ताविक मिसाळ गुरुजी यांनी मांडले तर आभार मां. बबन येडगे सर यांनी मानले.
सदर ,"गुरू शिष्य जयंती उत्सव ,"मोठ्या आनंदात वैच्यारिक पद्धतीने साजरा केला गेला.
त्यासाठी कोर्ती गावातील , म.फुले जयंती उत्सव समिती ने विशेष परिश्रम घेतले.

0 Comments