पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पदवी व पदविका व पदव्युत्तर), फार्मसीच्या पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सोयीसाठी एकूण सहा वसतिगृहांना ‘हायर स्मार्ट सोल्युशन’ या कंपनीतर्फे तब्बल चाळीस वॉशिंग मशीन्स भेट स्वरुपात देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कपडे धुण्यासाठी लागणारा वेळ आता या मशीन्समुळे वाचणार आहे.
‘हायर स्मार्ट सोल्युशन’ कंपनीचे महाराष्ट्र विभागाचे डेप्युटी इन्चार्ज महेंद्रसिंग रावत यांच्या शुभहस्ते मुलींच्या वसतिगृहात वॉशिंग मशीन्स रूमचे उदघाटन करण्यात आले. मुलांच्या ३ वसतिगृहांना २० वॉशिंग मशीन्स व विद्यार्थिनींच्या ३ वसतिगृहांना २० वॉशिंग मशीन्स असे मिळून एकूण ४० वॉशिंग मशीन्स हायर स्मार्ट सोल्युशन तर्फे स्वेरीच्या वसतिगृहाला भेट स्वरुपात देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रत्येक मशीन ही दहा किलो वजनाची आहे. हायर स्मार्ट सोल्युशन कंपनीचे विभागीय संचालक हेमंत बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र विभागाचे डेप्युटी इन्चार्ज महेंद्रसिंग रावत यांनी प्रत्यक्ष वसतिगृहात मशीन चालवून प्रात्यक्षिक दाखविले. या मशीन्स ऑटोमॅटिक पद्धतीने चालतात. पालक मेळाव्यातून कॉलेज प्रशासनाला विद्यार्थ्यांचा कपडे धुण्यासाठी लागणारा वेळ हा अभ्यासासाठी देण्यासाठी वॉशिंग मशीन्स लावण्याची मागणी केली होती. पालक मेळाव्यातून आलेल्या सूचना बारकाईने तपासून त्या कमी कशा करता येतील याकडे कॉलेज प्रशासनाचा कल असतो. याच पार्श्वभूमीवर हायर स्मार्ट सोल्युशन कंपनीने मोफत मशीन देण्याचा प्रस्ताव स्वेरी समोर सादर केला होता. त्यामुळे आज मुला व मुलींच्या वसतिगृहात ‘हायर स्मार्ट सोल्युशन’ कंपनीने ४० वॉशिंग मशीन्स भेट स्वरुपात दिल्या आहेत. प्रस्तावनेत वसतिगृह व्यवस्थापक डॉ. के. बी. पाटील म्हणाले की, ‘मुला-मुलींना आता कपडे धुण्यासाठी लागणारा वेळ वाचणार असून या वेळेचा सदुपयोग करण्याची संधी स्वेरीने दिली आहे. यावेळी महेंद्रसिंग रावत यांनी वॉशिंग मशीन्सचा वापर मोबाईल अॅप मार्फत कसा करायचा याचे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले. ही मशीन ऑटोमॅटिक पद्धतीची असून विद्यार्थी व विद्यार्थिनींना सहज वापरता येणार आहे. यावेळी माजी विद्यार्थिनी सचिवा राजनंदिनी पाटील यांनी स्वेरीच्या वसतिगृहांचे वेगळेपण स्पष्ट केले. उदघाटन प्रसंगी वॉशिंग मशीन रूमची सजावट एम.बी.ए. च्या विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या केली होती. उदघाटन प्रसंगी स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, इन्फ्रास्ट्रक्चर अधिष्ठाता व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. डी.ए. तंबोळी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा.ए. ए. मोटे, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी, मुलांच्या वसतिगृहातील कर्मचारी श्रीकांत पवार, सौरभ चौगुले, जयवीर देशमुख, प्रवीण वाघमारे, अजय जोकार, दशरथ हावळे, तसेच मुलींच्या वसतिगृहातील कर्मचारी द्रोपती शेळके, संतोषी गंगेकर, संध्या काकडे, अश्विनी म्हमाणे, सुषमा मागाडे, शोभा भोसले व पूजा राठोड यांच्या सह विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
चौकट-
.... आणि डॉ रोंगे सरांनी परंपरा जपली !
मशीन रुमच्या उदघाटन प्रसंगी कंपनीतर्फे जाहिरात असलेला केक आणला होता. हा केक कापण्याचा आग्रह कंपनीचे डेप्युटी इन्चार्ज महेंद्रसिंग रावत यांनी केला असता सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे सरांनी केक कापण्यास स्पष्ट नकार दिला. यावर खुलासा करताना डॉ. रोंगे सर म्हणाले की, ‘या मुलींच्या वसतिगृहात साधारण ३५०० विद्यार्थिनी वास्तव्यास आहेत. जर संख्येनुसार सरासरी काढल्यास दररोज १० जणींचा वाढदिवस येतो. स्वेरीच्या परंपरेनुसार या स्वेरी कॅम्पसमध्ये केक कापून उत्साह साजरा केला जात नाही. हे ऐकून रावल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सहकार्य केले. एकुणच स्वेरीची परंपरा डॉ. रोंगे सरांनी उत्तम पद्धतीने जपल्याचे या घटनेतून दिसून आले.

0 Comments