पंंढरपूर (प्रतिनिधी) : चंद्रभागेच्या पात्रात कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन कक्ष निर्माण करून यामध्ये आदिवासी महादेव कोळी जमातीच्या पट्टीच्या पोहता येणाऱ्या तरुणांचा समावेश करावा. अशी मागणी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे.
नुकत्याच चंद्रभागेच्या पात्रात बुडून तीघांचे बळी गेले असुन आजही एका मुलीने नदीत उडी घेतल्याने ती बुडाली आहे, या आधीही अनेक निष्पाप वारकरी भाविक आणि पंढरपुरातील स्थानिक नदीत बुडून मृत्युमुखी पडले आहेत. या सर्व घटनांमध्ये आदिवासी महादेव कोळी जमातीच्या तरूणांनीच शोधकार्यात सहभागी होऊन बुडालेल्या कित्येकांची प्रेतं नदीतुन बाहेर काढले आहेत तर बुडताना अनेकांचे प्राणही वाचवले आहेत.
मुळात नदीपात्रात अशा घटना घडूच नये आणि कोणी बुडाले तर तातडीने त्यांना वाचवण्यासाठी नदीच्या पात्रात कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची निर्मिती मंदिर समिती मार्फत करावी आणि यामध्ये आदिवासी महादेव कोळी जमातीच्या पट्टीच्या पोहणा-या तरुणांचा सहभाग करावा. अशी विनंती गणेश अंकुशराव यांनी या निवेदनात केली आहे.
याबाबत आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने मागणी करत आहोत. मा. जिल्हाधिकारी यांचेकडेही एका निवेदनाद्वारे आम्ही मागणी केली आहे.
तरी आपण परिस्थिती चे गांभीर्य ओळखून तातडीने मंदिर समिती ची बैठक घेऊन व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, मुख्यमंत्री. आमदार, खासदार यांचेशी चर्चा करून अशाप्रकारची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करून यामध्ये कोळी समाजातील तरुणांची नेमणूक करावी. असंही गणेश अंकुशराव यांनी म्हटलं आहे.
आत्तापर्यंत चार ते पाचजण नदीत बुडून मृत्युमुखी पडले आहेत, येत्या काळात आषाढी वारी भरणार आहे, त्यामुळे आता तरी मंदिर समिती नं नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करावी, लाईटची, बोटींगची व कोळी समाजातील पोहण्यात तरबेज असलेले किमान २४ तरुणांची याठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक करावी अशी मागणी गणेश अंकुशराव यांनी केली आहे.
..............................................
मा. संपादक पत्रकार साहेब कृपया वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिक, साप्ताहिक, इलेक्ट्रॉनिक मिडीया, युट्यूब न्युज चॅनल वेब पोर्टल वर प्रसिद्ध करुन सहकार्य करावे ही नम्र विनंती.🙏
कळावे आपला
- गणेश अंकुशराव
- मोबाईल - 9370271730
0 Comments