आज अरण येथे संत सावता माळी चंदन उटी कार्यक्रमासाठी ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आले असता भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली भाऊ हळणवर यांनी निवेदन दिले की संत सावता माळी यांच्या भक्तीसाठी स्वतः विठ्ठलाने त्यांच्या आरण येथील शेतामध्ये जाऊन दर्शन दिले होते पंढरपूर कडे अनेक संतांच्या पालख्या येतात राज्य सरकारने हे सगळे पालखी मार्ग चौपदरीकरण केलेलं असून संत सावता माळी यांच्या भेटीसाठी पांडुरंगाची पालखी आरण येथे जात असते परंतु आरण कडे जाणारा रस्ता एकेरी असल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते प्रत्येक वारीच्या वेळेस भाविक प्रचंड संख्येने आरण येथे दर्शनासाठी येत असतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरण या तीर्थक्षेत्राला अ दर्जा देऊन 100 कोटी निधी जाहीर केला असून एक मोठे विकासाचे काम येथे होणार आहे आरणला येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता हा रस्ता अपुरा पडणार आहे म्हणून आरण ते पंढरपूर या रस्त्यात चे पालखी मार्गात रूपांतर करून हा रस्ता चौपदरीकरण करावा अशी मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली यावेळी माऊली भाऊ हळणवर भाजपा करकंब मंडलाध्यक्ष हर्षद कदम संजय लवटे सर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments