पंंढरपूर (प्रतिनिधी) : आज पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रात होडी मध्ये महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर चंद्रभागेच्या पात्रात होडीमधून भव्य अशी मिरवणूक काढत गुरू शिष्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
पंढरीतील महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी हा गुरू-शिष्य जयंतीचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चंद्रभागेचे वाळवंट क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचा विजय असो, बोलो रे बोलो जय भीम बोलो! च्या घोषणांनी दुमदुमून गेलेला आढळून आला.
यावेळी बोलताना महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव म्हणाले की, सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही समतेची शिकवण देणा-या व संतांची भुमी असलेल्या भुवैकुंठ पंढरी नगरीत चंद्रभागेच्या पात्रात असलेल्या आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकासमोर महात्मा ज्योतिबा फुले व महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व होडीमधून भव्य अशी मिरवणूक काढली. महामानवांचे विचार हे आपल्या तरूणाईला प्रेरणा देणारे असतात त्यामुळे हे विचार चिरंतनपणे जिवंत रहावेत यासाठी आम्ही सतत प्रयत्न करू. असे मतही यावेळी गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले.
यावेळी गणेश अंकुशराव, अनिल अधटराव, गणेश तारापूरकर, सुरज कांबळे, अप्पा करकमकर, सुहास साळुंखे, सचिन नेहतराव, माऊली कोळी, दत्तात्रय कोरे, सोमनाथ करकमकर, निखील करकमकर व असंख्य तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.
...................................
मा. संपादक पत्रकार साहेब कृपया वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिक, साप्ताहिक, इलेक्ट्रॉनिक मिडीया, युट्यूब न्युज चॅनल वेब पोर्टल वर प्रसिद्ध करुन सहकार्य करावे ही नम्र विनंती.🙏
कळावे आपला
- गणेश अंकुशराव
- मोबाईल - 9370271730
0 Comments