पंढरपूर (प्रतिनिधी)
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांना समाजसेवक मुस्लिम युवक मुजम्मील कमलीवाले यांनी चक्क स्वतःच्या रक्तानं काढलेलं चित्र भेट दिली.सावळ्या विठुरायाच्या चरणापाशी हा सोहळा पार पडला. या आगळ्यावेगळ्या सोहळ्याने हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्यासह उपस्थित सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. बुधवारी विठ्ठल मंदिरात हा सोहळा मोठ्या थाटात पार पडला.
तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये मुजमील कमलीवाले हा मुस्लिम समाजसेवक अनेक वर्षांपासून नावारूपाला आला आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिके त्यांना मिळाली आहेत. समाजासाठी भव्य दिव्य काम करणारा समाजसेवक , श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या प्रभावाखाली आला. महाराजांनी केलेल्या मदतीने भारावून गेला. त्याने मागील आठ दिवसात हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर
यांचे स्वतःच्या रक्तातून चित्र बनवले. या चित्राची प्रसिद्धी माध्यमांनीही दखल घेतली.
हेच चित्र हभप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांना सुपूर्द करण्यात आले. हे गुरु शिष्याचे चित्र सबंध विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावरून व्हायरल केले.
समाजसेवक मुजमील कमलीवाले हे पंढरपूर शहरातील आदर्श व्यक्तिमत्व आहेत. गरीब समाजातील मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी आजवर केले आहे. उपेक्षित लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. यामुळेच त्यांना श्रीलंका येथे आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे . श्रीलंका येथे हा सन्मान मिळाल्यानंतर कमलीवाले यांचे पंढरी नगरीत आगमन झाले . हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने, त्यांचे कौतुक समाजातील सर्व स्तरातून होत आहे. या भूमिपुत्र समाजसेवकाचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडूनही सन्मान करण्यात आला.
0 Comments