LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*करकंब येथील धाकटी वेस बंधाऱ्याच्या पुलाचे आ.अभिजीत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन*



प्रतिनिधी/- 

पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील धाकटी वेस बंधाऱ्यावरून पुलाचे अनेक वर्षांपासून प्रलंबित कामाचा प्रश्न आमदार अभिजीत पाटील यांनी मार्गी लावत कामाचे उद्घाटन करण्यात आले. 

मागील अनेक वर्षांपासून करकंब येथील धाकटी वेस येथील ओढ्याच्या बंधाऱ्यावरून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते त्यामुळे गावातील शेतकरी, विद्यार्थी व वयोवृद्ध नागरिकांचे हाल होत होते त्यामुळे आता लवकरच ओढ्याच्या पुलावरील उंची वाढून नागरिकांना त्याचा फायदा होणार असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.

आज उदघाटन आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते नवीन पुलाचे उदघाटन करण्यात आले आहे.यावेळी उद्योजक अमोल (दादा) शेळके, पै.सुभाष गुळमे, बापू रेडे, अजित देशमुख,अशोक देशमुख,काका देशमुख, बाजीराव वंजारी, शंकर राऊत, राजू शेटे, संतोष शिंदे,राजाभाऊ खारे, शिवाजी सलगर, सचिन दुधाळ, पांडुरंग शेटे, उमेश पांढरे, संतोष घाडगे, उस्मान माणेरी, विलास घाटूळे, गणेश शिंदे, अशोक नाईकनवरे, भिमराव मदने आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments