त्याच अनुषंगाने मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महामंडळाच्या व बँकेकडून येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी *जनता दरबार* आयोजित केला आहे तरी गुरुवार, दिनांक १५ मे २०२५ रोजी सकाळी १०.०० ते दु.३.०० वाजेपर्यंत ,स्थळ - अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ उपकेंद्र कार्यालय,गाळा नंबर ७, इंदिरा गांधी चौक शॉपिंग सेंटर,पहिला मजला ,पंढरपूर जि.सोलापूर येथे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष मा.ना.श्री.नरेंद्र अण्णासाहेब पाटील(मंत्री दर्जा) हे उपस्थित राहणार असून
पंढरपूर,मंगळवेढा, सांगोला व माळशिरस तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांना महामंडळाच्या योजनेसंदर्भात येणाऱ्या अडचणीची सोडवणूक करून घेण्याकरिता या ठिकाणी तमाम मराठा बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष ना.श्री.नरेंद्र पाटील यांनी केले आहे.
0 Comments