दिनांक, १० मे २०२५
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, भारतीय सैन्यदलाचे मनोबल वाढविण्यासाठी, ज्या भारतीय सैन्यामुळे देश आणि आपण सगळे सुरक्षित आहोत त्यांच्या समर्थनार्थ खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे आणि मान्यवर नेतेमंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत चार हुतात्मा पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सोलापूर पर्यंत "जय हिंद यात्रा" काढण्यात काढण्यात आली.
यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन देशभक्ती गीतांसोबत, भारतीय सेना झिंदाबाद, वीर जवान संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, वंदे मातरम्, आवाज दो हम एक है, पाकिस्तान मुर्दाबाद, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है, भारत माता की जय, जिसने आतंक फैलाया उसको सेना ने सबक सिखाया, हर हमले को किया नाकाम भारत की सेना को सलाम अश्या जोरजोरात घोषणाबाजीने पूर्ण परिसर दुमदुमून गेला.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान मधील आतंकवाद्यांच्या ठिकाणावर हल्ला करून पाकिस्तानचे कंबरडे मोडले. सैन्यदलाने राबविलेल्या ऑपरेशन सिंदुर आणि इतर कारवाईला देशातील काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला. देशासाठी, देशातील लोकांसाठी पाकिस्तानच्या विरोधात एकत्र राहणे हीच आपली ताकद आहे. पहलगाम आतंकवादी हल्ला करुन पाकिस्तानने धार्मिक तेढ़ निर्माण कारण्याचाही प्रयत्न केला त्याचा निषेध करते.
पाकिस्ताने सीमा भागातील भारतीय शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला शेकडो ड्रोन मिसाईल्स हल्ले सैन्यदलाने वरचेवर निकामी केले. भारत अत्याधुनिक शस्त्रास्त्राने परिपूर्ण आहे. भारताची सैनिकी ताकद पाकिस्तान पेक्षा खुप मोठ्ठी आहे. हे त्यांना कळून चुकले आहे. सुदर्शन चक्र सारखे अनेक मिसाईल्स चार चार हजार किलोमीटर वरचा अचूक नेम धरून हल्ला करतात. आपल्या सैनिकांच्या धैर्य दृढ निश्चय आणि देशभक्तीचा सलाम करते त्यांचे अभिनंदन करते. आपल्या सशस्त्र दलांच्या आम्हाला अभिमान आहे. मातृभूमिचे रक्षण करण्यास समर्थ आहेत. या लढाईत भारतमातेसाठी आपल्या जीवाचं बलिदान देणाऱ्या सर्व शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. त्यांच्या कुटुंबियांचे ही आभार मानते. आत्ता शस्त्रसंधी झाली आहे. ही चांगली गोष्ठ घड़ली आहे यामुळे अनेक जीव वाचणार आहे. १९७१ साली इंदिराजी गांधी यांच्या कणखरपणामुळे पाकिस्तानने शरणागती पत्करली होती अमेरिकेला ठाम शब्दात सांगितले होते की, हिंदुस्थान कोणाच्या भीतीने झुकत नाही कोणत्याही देशाने भारताला आदेश द्यायचे धाडस करू नये त्याची आज आठवण होत आहे. या संकटाच्या काळात मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या सशस्त्र दलांसोबत देशांसोबत काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे. यासाठीच ही जयहिंद यात्रा आहे. नेहमी विजय हिंदुस्थानचाच होणार आहे.
या जय हिंद यात्रेत खासदार प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, महिला काँग्रेसचे अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, माजी महापौर संजय हेमगड्डी, आरिफ शेख, अलकाताई राठोड, सुशीला आबुटे, प्रवक्ते अशोक निंबर्गी, मा. नगरसेवक रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, दत्तू बंदपट्टे , भोजराज पवार, श्रीदेवी फुलारे, परवीन इनामदार, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, प्रदेश सरचिटणीस नरसिंह आसादे, शकील मौलवी, सुभाष चव्हाण, राहुल वर्धा, हणमंतू सायबोलू, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, बाबू म्हेत्रे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जुबेर कुरेशी, वक्ता सेल अध्यक्ष नागनाथ कदम, VJNT अध्यक्ष युवराज जाधव, उद्योग सेल अध्यक्ष पशुपती माशाळ, प्रदेश प्रतिनिधी सुशील बंदपट्टे, एजाज बागवान, सागर उबाळे, रुपेश गायकवाड, सातलिंग शटगार, नागेश म्याकल, महेश जोकारे, विश्वनाथ साबळे, अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे, NK क्षीरसागर, आझम सैफन, भारतीताई ईप्पलपल्ली, हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, संघमित्रा चौधरी, अनिल मस्के, दिनेश म्हेत्रे, अशोक कलशेट्टी, लखन गायकवाड, रमेश हसापुरे, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, गौतम मसलखांब, नूर अहमद नालवार, चक्रपाणी गज्जम, सायमन गट्टू, सैफन शेख, विवेक कन्ना, राजेंद्र शिरकुल, इलियास शेख, बशीद इंगळगी, विवेक इंगळे, परशुराम सतारेवाले, राजेश झंपले, शुभम यक्कलदेवी, अनिल जाधव, नासिर बंगाली, रवी आंबेवाले, नागेश म्हेत्रे, रमेश जाधव, रजाक कादरी, शिवशंकर अंजनाळकर, गिरिधर थोरात, नागनाथ शावने, शशिकांत जाधव, सोहेल शेख, संध्याताई काळे, करिमुनिसा बागवान, चंदा काळे, मुमताज तांबोळी, शुभांगी लिंगराज, रमेश फुले, लक्ष्मण गडगी, भीमराव शिंदे, तौसिफ शेख, बिट्टू कुरेशी, प्रकाश गेंट्याल, मनोहर मार्चला, सुनील सारंगी, गंगाधर शिंदे, शिवाजी साळुंखे, मोहसीन फुलारी, सोहेल पठाण, सुशीलकुमार म्हेत्रे, दिनेश डोंगरे, महेंद्र शिंदे, इरफान शेख, शाहू सलगर, मुर्तुज काझी, रवी कल्याणकर, ज्ञानेश्वर जाधव, वर्षा अतनुरे, मुमताज शेख, विजयालक्ष्मी झाकणे, राज शिंदे, सुनील डोळसे, अभिलाष अच्युगटला, धर्मराज गंडे, अनिता भालेराव, रोहिणी गायकवाड, चंद्रकांत नाईक, दीपक मठ, विजय बालनकर, चंद्रकला निजमल्लू, अन्वर शेख, सायली पठाण यांच्यासह हजारो नागरिक बंधु भगिनी सहभागी झाले होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments